पुणे येथे महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई सेवेतून निलंबित !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. विवाहाचे आमीष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तुषार सुतार या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली. या पोलीस शिपायाच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली होती. (केवळ सेवेतून निलंबित करून चालणार नाही ! गुन्हेगारी वृत्तीच्या पोलीस शिपायाला कायद्यानुसार कडक शिक्षा करून कायमचे बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

तुषार सुतार हा खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता. वर्ष २०१९ मध्ये पीडित महिलेची आणि तुषारची सामाजिक माध्यमांतून ओळख झाली. तुषारने मी विवाहित असून पत्नीसमवेत रहात नाही, असे सांगून फसवणूक केली. पोलीस शिपाई सुतार याच्या वर्तनामुळे पोलीसदलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

पोलीसच फसवणूक करणारे असतील, तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा ?