विधी महाविद्यालयात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने विरोध केल्याचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – येथील जोगेश चंद्र विधी महाविद्यालयामधील श्री सरस्वतीदेवी पूजा करतांना संरक्षण देण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संयुक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवेल’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की, बाहेरील लोक त्यांना धमकावत आहेत आणि श्री सरस्वतीदेवीच्या पूजेची सिद्धता करण्यात अडथळा आणत आहेत.
⚖️ Calcutta High Court orders security for Hindu students to perform Saraswati Puja after a TMC leader Shabbir Ali objects to pooja at Jogesh Chandra Chaudhuri College!
In Mamata Banerjee’s Bengal, Hindus must seek Court permission just to worship—shameful! 😡
Is Bengal… pic.twitter.com/wBeoxSS6sz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2025
१. कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्हाला राज्य आणि महाविद्यालयीन अधिकारी यांना निर्देश देण्याची मागणी करणारा अर्ज मिळाला आहे. कोलकात्यातील प्रिन्स अन्वर शाह मार्गावरील जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालय आणि जोगेश चंद्र चौधरी विधी महाविद्यालय यांना पुरेशी सुरक्षा आवश्यक आहे. श्री सरस्वतीदेवीची पूजा थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत कोणताही बाहेरील व्यक्ती बलपूर्वक महाविद्यालय परिसरात प्रवेश करू शकत नाही. पूजा करण्यासाठी मुक्त प्रवेश आणि बाहेर पडणे बंद केले पाहिजे.
२. बंगाल तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेचे (तृणमूल काँग्रेसची विद्यार्थी शाखेचे) सरचिटणीस महंमद शब्बीर अली यांच्यावर धमक्या देण्याचा आणि पूजा थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. पूजा आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांना बलात्कार आणि हत्या करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर दिलासा व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना त्यांचा धर्म साजरा करण्याचा अधिकार आहे.
३. बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी सांगितले होते की, मागील वर्षीप्रमाणेच जोगेश चंद्र विधी महाविद्यालयामध्ये पूजा करण्यास अनुमती देण्यात यावी आणि पूजा थांबवण्याचा प्रयत्न करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. महाविद्यालयामध्ये पूजा थांबवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ दिला जाणार नाही. जर कुणी धमकी दिली, बळाचा वापर केला किंवा इतर कोणत्याही प्रकारे उत्सव थांबवण्याचा प्रयत्न केला, तर कठोर कारवाई केली पाहिजे.
३० जानेवारी या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांनंतर बॅनर्जी यांनी हे स्पष्टीकरण दिले होते.
४. एका विद्यार्थिनीने सांगितले की, हे बाहेरचे लोक पैसे उकळण्यासाठी महाविद्यालयात येतात. त्यांना वाटते की, आम्ही श्री सरस्वतीदेवीची पूजा आयोजित करू नये. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. त्यांनी आमच्यावर बलात्कार करण्याची धमकीही दिली.
५. दुसर्या एका विद्यार्थ्याने सांगितले, आम्हाला पूजा आयोजित करण्याचा अधिकार आहे. आम्हाला का थांबवले जात आहे? आम्हाला सांगण्यात आले आहे की, जर आम्ही श्री सरस्वतीदेवी पूजा आयोजित केली, तर तो अन्वर शाह मार्गावरून जातांना आम्हाला मारून टाकेल. ते इथे पैसे गोळा करत आहेत.
६. प्राचार्य पंकज रॉय म्हणाले की, गेल्या वर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश करतांना मला त्रास झाला. माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत मी हे कधीही पाहिले नाही. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी यापूर्वी महाविद्यालय प्रशासनाने पूजेसाठी अनुमती दिली नसल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. या घटनेबाबत राज्य आणि केंद्र शासन यांना पत्र लिहिले आहे. (प्राचार्यही हतबल असतील, तर बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|