इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने केली हत्या !
लखीमपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीला आसिफ याने आमीष दाखवून पळवून नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. पीडित हिंदु अल्पवयीन मुलीने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, तेव्हा आसिफ याने त्याच्या मित्रांच्या साहाय्याने तिची हत्या केली. तिचा मृतदेह लखीमपूरपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर जंगलात फेकण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आसिफ व्यतिरिक्त सलमान, रजब आणि झुबैर यांच्यासह ६ जणांना अटक केली आहे.
१. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोरिया गावात रहाणारी १७ वर्षीय हिंदु अल्पवयीन मुलगी २५ जानेवारी २०२५ या दिवशी बेपत्ता झाली. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पडुआ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
२. पोलिसांना तपासात आढळून आले की, आसिफ याने तिचे अपहरण केले आहे. पोलिसांनी डेहराडून येथून आसिफ आणि त्याचे साथीदार यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, हिंदु अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असूनही धर्मांध मुसलमान लव्ह जिहादी कारवाया करून हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. हे लक्षात घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा अधिक कठोर करून कार्यवाही करणे आवश्यक ! |