Pakistani Terrorist Arrested At Chennai : पाकिस्तानी आतंकवाद्याला चेन्नईमध्ये अटक !

आतंकवादी महंमद झकरिया

चेन्नई – भारतीय गुप्तचर यंत्रणांनी महंमद झकरिया नावाच्या पाकिस्तानी आतंकवाद्याला चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच अटक केली. तो श्रीलंकेला जाण्याचा प्रयत्नात होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) त्याला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. झकारिया हा ‘खलिफा’ नावाच्या पाकिस्तानी इस्लामी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे.

१. महंमद झकरिया गेल्या २५ वर्षांपासून भारतात रहात असल्याचे सांगण्यात येत आहे. तो हॉटेल किंवा व्यवसायाच्या नावाखाली आतंकवादी कारवाया करत असे.

२. ‘एन्.आय.ए.’ने त्याच्याकडून ‘जमात-ए-इस्लामी पाकिस्तान’शी संबंधित साहित्यही जप्त केले आहे. महंमद झकरिया हा ‘खलिफा’ संघटनेचा भारतीय प्रमुख आहे. तो भारतातील ‘खलिफा’च्या कारवाया हाताळत होता. तो तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथील स्लीपर सेल्सचे (आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांशी) समन्वय साधत होता.

३. गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार झकरिया त्याच्या गटाच्या नेत्याचे निधन झाल्यामुळे नव्या नेत्याच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी श्रीलंकेमार्गे पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न करत होता.

४. झकरियाला भारतात २ बायका आणि १० मुले आहेत. तो लोकांना खलिफाशी जोडण्याचे काम करत होता. धर्मांतराच्या कारवायातही त्याचा सहभाग होता. त्याने अनेक लोकांचे धर्मांतरही केले आहे.

संपादकीय भूमिका

अशांचे खटले जलद गती न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक !