प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचा कक्ष बाहेरून दिसल्यानंतर माझ्या मनात आले की, एकदा तरी हा कक्ष पहावा. त्यानुसार आम्ही सर्व आज प्रदर्शन पहायला आलो. अगदी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत दिनचर्या कशी असायला हवी ? हे या प्रदर्शनात सांगितले गेले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्चित सर्वांनी वाचायला हवेत, असे मत येथील ‘श्रीदिगंबर वेद विद्यालया’चे अध्यापक वेदमूर्ती श्री. महेश दुबे यांनी केले. सनातन संस्थेच्या सेक्टर ९ मधील प्रदर्शनकक्षाला त्यांनी भेट दिली. ‘श्रीदिगंबर वेद विद्यालया’ हे विद्यालय श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

या वेळी श्रीदिगंबर वेद विद्यालयाचे २० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. त्यांपैकी एका विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हिंदु धर्म हाच एकमात्र धर्म असून अन्य सर्व पंथ आहेत. सर्वांनी धर्माचे पालन करायला हवे. सनातन संस्थेने लावलेले प्रदर्शन पुष्कळ सुंदर आहे. मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे.