
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यामध्ये ई रिक्शाद्वारे सनातन संस्थेकडून अभिनव पद्धतीने अध्यात्मप्रसार केला जात आहे. ई रिक्शाला ‘ग्रंथ प्रदर्शना’चे स्वरूप देऊन त्यामध्ये सनातनच्या अध्यात्म, राष्ट्र-धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार आदी विविध भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. यासह सनातनची सात्त्विक उत्पादनेही ‘ई रिक्शा’मध्ये आहेत. सध्या ही ‘ई रिक्शा’ सेक्टर २० मध्ये श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या बाहेर कार्यरत आहे. भाविकांच्या गर्दीनुसार विविध भागांमध्ये ही रिक्शा जाते. या रिक्शात असलेल्या साधकांकडून भाविकांना धर्मशिक्षण जाणून घेण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे रस्त्याने जाणारे जिज्ञासू आवर्जून ई रिक्शावर येऊन सनातनचे अध्यात्म प्रसारविषयक ग्रंथ घेत आहेत. नियमित सकाळी ९.३० ते रात्री ८.३० या वेळेत या ई रिक्शाद्वारे प्रभावीपणे आध्यात्मप्रसार चालू आहे.