उल्हासनगर येथे ८२ किलोचे २२ सहस्र ९६० रुपयांचे गोमांस जप्त !

गोप्रेमीच्या सतर्कतेनंतर पोलिसांची कारवाई

प्रतिकात्मक चित्र

उल्हासनगर – शहाड फाटकाकडून जात असतांना एका रिक्शातून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचे गोप्रेमी श्री. मनोज गौड यांच्या लक्षात आले. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक) ते गोमांस एका दुकानात उतरवण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी आले. या वेळी त्यांनी ८२ किलोचे २२ सहस्र ९६० रुपयांचे गोमांस, तसेच अन्य साहित्य असा एकूण २४ सहस्र ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी मांसविक्रेता महंमद रफिक अब्दुल रज्जाक शेख (वय ५० वर्षे), खैरुनिसा यासीन सय्यद, कमरू अब्दुल करीम शेख यांच्या विरोधात श्री. मनोज गौड यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.