अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केल्याचे प्रकरण !

शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – साईबाबा मंदिर परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी आहेत. इतर समाधींवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे जमा होतो, तर अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर आक्षेप घेतला आहे. हा सगळा प्रकार अवैध असून समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे. संग्राम जगताप यांनी दर्ग्याविषयी आक्षेप व्यक्त केल्यानंतर आता ‘मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन’ने संग्राम जगताप यांना पत्र लिहिले आहे. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याचे पूर्णपणे दायित्व संग्राम जगताप यांचे राहील, अशी भूमिका सलीम सारंग यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे शिर्डी मंदिर परिसरातील हाजी अब्दुल बाबा दर्गा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.