महाकुंभ हे श्रद्धेची महान यज्ञक्रिया आहे ! – अरुण गोविल, खासदार तथा अभिनेते

खासदार तथा अभिनेते अरुण गोविल

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभ हे श्रद्धेची महान यज्ञक्रिया आहे. महाकुंभ हा आपली संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वांत मोठे प्रतीक आहे. १४४ वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला आहे. जीवनात एकदा तरी प्रत्यकाने कुंभक्षेत्री स्नान केले पाहिजे. त्रिवेणी संगमाचे पाणी अमृतासमान पवित्र आणि जीवनदायी आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार तथा अभिनेते श्री. अरुण गोविल यांनी २७ जानेवारी या दिवशी येथे केले. त्यांनी कुंभक्षेत्री त्रिवेणी संगम येथे स्नान केल्यानंतर वरील विधान केले.

ते म्हणाले, ‘‘आज आम्हाला या अमृतमयी पाण्यात स्नान करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी पुष्कळ भाग्याची गोष्ट आहे. आजच्या तरुण पिढीलाही धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जोडण्याची इच्छा आहे, हा आपल्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत आहे. महाकुंभासारखे आयोजन आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.’’