|
पुणे – कुरारमध्ये घडलेल्या घटनेमधील पीडित महिला आणि त्यांच्या २ मुलींचा विनयभंग करणारा वार्ड अध्यक्ष हा तुतारी गटाचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या ज्या घटना होत आहेत, त्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी आघाडीवर आहेत. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या पदाधिकार्यांची कार्यशाळा घेऊन समाजात कसे वागायचे ? याचे धडे दिले, तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल, असा आरोप सौ. रूपाली चाकणकर यांनी केला आहे. राज्यात सातत्याने वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून राज्य महिला आयोग बरखास्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलतांना महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29001034/rupali-chakankar-1.jpg)
सौ. रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, मागील ३ वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत आहे. राज्यात कुठेही महिला अत्याचाराविषयी घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाची आठवण येते; कारण ‘राज्य महिला आयोग आपल्याला न्याय मिळवून देईल’, असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझ्या कामाचे यश आहे. महिला आयोग काम करत नाही, अशी टीका विरोधक करत आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून घरी बसण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्याकडे टीका करण्याविना दुसरे कोणतेही काम नाही.
संपादकीय भूमिकायाविषयी पक्ष काय करणार ? |