परळीच्या नगरपालिकेचे विशेष लेखा परीक्षण व्हावे ! – सुरेश धस, आमदार, भाजप

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

आमदार सुरेश धस

बीड – करुणा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवलेले होते. पिस्तुल ठेवणारी देशमुख नावाची व्यक्ती होती. धनंजय मुंडे यांच्या त्यागपत्राचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनेच घ्यावा. धनंजय मुंडे हे बीडचे ‘सुपर पालकमंत्री’ आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा भाजपसमवेत संबंध नाही. परळी आणि आष्टी येथील रस्त्यांची तुलना करा. परळीच्या नगरपालिकेचे विशेष लेखा परीक्षण व्हावे, असे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केले. ५ सहस्र पीक विमा घोटाळा चौकशी करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्या. मुख्यमंत्री फडणवीसच मुंडे यांचे पाठीराखे आहेत, असा आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यावर माझ्या त्यागपत्राविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

‘एस्.आय.टी. आणि सीआयडी चौकशी पुराव्यांचीही शहानिशा करावी लागते. वस्तूस्थिती पुढे आल्यावर प्रकरणाची चौकशी करू. दोषींना फाशी झाली पाहिजे. अंजली दमानिया यांनी माझी आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली. आमचे वरिष्ठ नेत्यांशी बोलणे होत असते. मी बीड येथे जाणार आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.