![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29004404/vijay2-2-1.jpg)
नवी मुंबई – सीवूड (नेरूळ) येथे ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे मालमत्ता प्रदर्शन २४ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली आणि या माध्यमातून हिंदूंना जागृत करून संघटित करण्याचे संस्थेचे काम प्रभावीपणे चालू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रंथप्रदर्शनाला माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर, ऐरोलीचे माजी आमदार श्री. संदीप नाईक, वाशीतील ‘शिव-विष्णु मंदिर प्रतिष्ठान’चे विश्वस्त श्री. आनंद कुलकर्णी, मनसे प्रवक्ते गजानन काळे आदी मान्यवरांनी भेट दिली.