New Orleans Terror Attack : ‘अल्लाच्या शत्रूंना मारतांना मरा’, हे कुराणामधील वाक्य असलेले पान आढळले उघडे !

  • न्यू ऑर्लिन्स (अमेरिका) येथील आक्रमणकर्ता शम्सुद्दीन जब्बार याच्या घराचा पोलिसांकडून तपास

  • न्यू ऑर्लिन्सची घटना आतंकवादी आक्रमण असल्याचे अमेरिकी पोलिसांनी केले मान्य !

आक्रमणकर्ता शम्सुद्दीन जब्बार

न्यू ऑर्लिन्स (अमेरिका) – ख्रिस्ताब्द नववर्षाच्या रात्री शम्सुद्दीन जब्बार या मुसलमानाने भरधाव ट्रक चालवत १५ जणांना चिरडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी त्याच्या घराचा तपास केला असता घरी एक भयानक दृश्य पहायला मिळाले. टेक्सास राज्यातील नॉर्थ ह्यूस्टनमधील त्याच्या घरात बाँब बनवण्याचे साहित्य, तसेच कुराण सापडले. विशेष म्हणजे, कुराणातील हिंसाचाराचे समर्थन करणारे पान उघडे असलेले आढळले. त्यामध्ये उतारा क्रमांक ९:१११ चा उल्लेख होता. त्यात ‘अल्लाच्या शत्रूंशी लढा आणि मारतांना मरा’, असे लिहिलेले आहे. पोलिसांनी हे आक्रमण ‘आतंकवादी आक्रमण’ असल्याचे आता मान्य केले आहे.

१. जब्बारच्या घरात उघड्या असलेल्या कुराणच्या उतारात लिहिले आहे की, अल्लाच्या शत्रूंना मारा आणि तसे करतांना मारले गेलो, तर अनंत काळासाठी स्वर्गात सुख भोगता येईल.

२. त्याच्या घरात इस्लामविषयी इतर अनेक पुस्तके आणि गुंडाळलेल्या प्रार्थनांचा एक संचही आढळला.

Take a look inside New Orleans terrorist Shamsud-Din Jabbar’s home

(सौजन्य : New York Post)

संपादकीय भूमिका

‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता गप्प का ? ‘हिंदु आतंकवादी’ असे म्हणणार्‍या काँग्रेसी नेत्यांना यावरून आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !