देवद (पनवेल) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात स्‍वाक्षरी मोहीम !

स्‍वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेले धर्मप्रेमी हिंदू

देवद (पनवेल) – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु समाजाच्‍या वतीने स्‍वाक्षरी मोहीम घेण्‍यात आली. देवद ग्रामपंचायतीच्‍या ठिकाणी घेण्‍यात आलेली मोहीम राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघांचे सदस्‍य श्री. दत्तात्रय धोंदे यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या सहकार्याने राबवली. या मोहिमेत सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला. देवद गावचे सरपंच श्री. विनोद वाघमारे आणि उपसरपंच श्री. विजय वाघमारे यांनी स्‍वाक्षरी करून मोहिमेत सहभाग घेतला. अनेक हिंदूंनी स्‍वतःहून स्‍वाक्षरी करून मोहिमेत सहभाग घेतला.