विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी !

  • दौंड (पुणे) येथे इंग्रजी माध्यमातील प्रकार !

  • सुपारी देणारा आणि घेणारा विद्यार्थी अल्पवयीन 

  • मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर गुन्हा नोंद !

दौंड (पुणे) – विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे १२ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितले. त्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने एका विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी देत सांगितले की, विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिचा खून करा. दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला. या प्रकरणी विद्यार्थिनीने तक्रार प्रविष्ट केली.

१. सुपारी घेतलेल्या विद्यार्थ्याने हा प्रकार विद्यार्थिनीला सांगितला. तिने हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी वर्गशिक्षक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक यांकडे विचारणा केली. त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्याने तक्रार प्रविष्ट केली.

२. पोलिसांनी चौकशी केल्यावर मुख्याध्यापकांनी संबंधित पीडितेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे समजले.

३. पीडितेची शैक्षणिक हानी केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

अल्पवयीन विद्यार्थी हत्येची सुपारी देतात म्हणजे शाळेतून गुन्हेगारांची निर्मिती होत आहे, हे राष्ट्रासाठी तितकेच भयानक !