उल्लंघन केल्यास ९७ सहस्र रुपयांपर्यंत दंड होणार !
(बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकणारे वस्त्र)
(नकाब म्हणजे चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र)
बर्न (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडने अलीकडेच बुरखा आणि नकाब यांसारख्या चेहरा झाकणार्या वस्त्रांवर बंदी घालणारा कायदा संमत केला आहे. हा कायदा स्वित्झर्लंडमध्ये १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल.
१. स्वित्झर्लंडच्या संसदेने १५१ विरुद्ध २९ मतांनी या संदर्भातील विधेयक संमत केले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्याला संमती दिली होती. ‘जर कुणी या कायद्याचे उल्लंघन केले, तर त्याला १००० स्विस फ्रँकचा (अनुमाने ९७ सहस्र रुपयांचा) दंड केला जाईल’, असे यात म्हटले आहे.
२. स्वित्झर्लंडमधील हा कायदा वर्ष २०२१ मध्ये झालेल्या सार्वमतचा परिणाम आहे, ज्यामध्ये स्विस मतदारांनी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याचे समर्थन केले. स्वित्झर्लंडमध्ये ५१.२ टक्के लोकांनी बंदीच्या बाजूने मतदान केले होते.
३. स्विस सरकारने कायद्यात हे स्पष्ट केले की, ते विमानांत किंवा दूतावासातील इमारती या ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालणार नाहीत.