वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील सुमेरु पिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी महाकुंभमध्ये मुसलमान समुदायाच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, महाकुंभामध्ये मुसलमान समुदायाची उपस्थिती सनातन धर्माच्या अनुयायांच्या श्रद्धेला इजा पोचवू शकते. महाकुंभपर्वात सर्व समुदायांच्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.
१. राष्ट्रहिताऐवजी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारे वक्तव्य करणार्या विरोधी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
२. महाकुंभ पर्वामध्ये संतांनी वक्फ बोर्डाची मान्यता रहित करणे आणि सनातन मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, यांसारख्या सूत्रांवर चर्चा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
३. वक्फ बोर्डाची मान्यता रहित करता येत नसेल, तर देशात सनातन धर्मासाठी विशेष मंडळ स्थापन करावे. या वेळी शंकराचार्यांनी राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर सनातन हिंदु महासंघाच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला.