वक्फ कायदा नष्ट झाला पाहिजे ! – अधिवक्ता विष्णू शंकर जैन

  • मुंबईत विशेष व्याख्यान

  • जागोजागी अवैध मजारी बांधून भूमी जिहादाचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे)

विषय मांडतांना सर्वोच्च न्यायालयातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मुंबई – ‘वक्फ बोर्ड’ सुधारणा विधेयक आणण्याची मुळात आवश्यकताच नाही; कारण राज्यघटनेत ‘वक्फ’ शब्दाचा उल्लेखच नाही. त्यामुळे त्यामुळे वक्फ कायदा पूर्णतः नष्ट झाला पाहिजे, असे स्पष्ट मत हिंदु मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केले. श्री माटुंगा कच्छी मूर्तीपूजक जैन श्‍वेतांबर संघ आणि श्री माटुंगा जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक तपागच्छ संघ यांच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी ‘सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्थान : जागृती व आव्हाने’ या विषयावर अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांचे विशेष व्याख्यान माटुंगा सेंट्रल येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.

अधिवक्ता विष्णू शंकर जैन पुढे म्हणाले की,

१. वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.

२. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. तशी परिस्थिती भारतात येऊ नये, यासाठी हिंदूंना संघटित व्हावे लागेल.

३. जागोजागी अवैध मजारी (इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे) बांधून भूमी जिहाद करण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु कायदेशीररित्या सामान्य नागरिक त्याविरोधात आवाज उठवून संबंधित उच्च न्यायालयात जाऊन तक्रार प्रविष्ट (दाखल) करू शकतात.