रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’तील साधकांना आलेल्या अनुभूती !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

४. रामनाथी आश्रमाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

४ अ. सौ. शीतल माने, नवसारी, गुजरात. 

१. ‘मला रामनाथी आश्रमातील पाणी आणि हवा पुष्कळ हलकी वाटत होती.

२. ‘माझ्या प्रत्येक श्वासात आश्रमातील चैतन्य भरून घ्यावे’, असे मला वाटत होते.’

४ आ. सौ. अंजली मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५२ वर्षे), सिंधुदुर्ग 

अ. ‘आश्रमात प्रवेश केल्यावर मला गारवा जाणवला.

आ. येथे आल्यावर माझे मन निर्विचार स्थितीत होते.

इ. आश्रमातील मार्गिकेतून जातांना आणि ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर एक वेगळाच सुगंध जाणवत होता.

ई. चित्रीकरणकक्षात गेल्यावर ‘आपण एका निर्वात पोकळीत आहोत’, असे मला जाणवले. आरंभी ‘त्या ठिकाणी साधक आणि साहित्य आहे’, असे मला जाणवलेच नाही. ‘आपण एकटेच आहोत’, असे मला वाटले. तेथे मला सूक्ष्म नाद ऐकू आला.’

४ इ. सौ. योजना पाटील (वय ६३ वर्षे), सांगली 

अ. ‘मला गुडघेदुखी, दाढदुखी आणि पित्ताचा त्रास आहे. त्यांसाठी मी औषधे घेत असते; परंतु आश्रमात आल्यावर मला कुठलाच शारीरिक त्रास जाणवला नाही, तसेच मला औषधेही घ्यावी लागली नाहीत.

आ. मला लहान-सहान गोष्टींचे विस्मरण होते. त्यामुळे माझी चिडचिड होते आणि बहिर्मुखता वाढते; परंतु आश्रमात आल्यावर मला वस्तू किंवा कृती यांचे एकदाही विस्मरण झाले नाही.’

४ ई. सौ. मनीषा रामदास बोराटे, सातारा

अ. ‘आश्रमातील सभागृहात श्रीरामाचे चित्र आहे. त्या चित्रातील श्रीराम सजीव असून ‘तो कोणत्याही क्षणी उठून उभा राहील’, असे मला वाटले. जेव्हा मी चित्रावरून दृष्टी बाजूला केली, तेव्हा मला सूक्ष्मातून रामरूपातील गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

४ उ. सौ. जयश्री प्रवीण गोडसे, वडुज, सातारा. 

४ उ १. ‘रामनाथी आश्रमातील वातावरणात मला मंदिरासारखी शांतता आणि पुष्कळ चैतन्य जाणवले. 

४ उ २. प्रथम मी आश्रम परिसरातील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तेव्हा मला त्या मूर्तीत पुष्कळ सजीवता जाणवली. ‘सिद्धिविनायक माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले. 

४ उ ३. तेथे असलेल्या रामशिळेत मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. 

४ उ ४. श्री भवानीदेवीच्या मंदिरातील देवी जागृत असल्याचे जाणवणे आणि प्रार्थना केल्यावर ‘देवीने तिचा हात वर करून आशीर्वाद दिला’, असे दिसणे : ‘श्री भवानीदेवीच्या मंदिरातील देवी पुष्कळ जागृत आहे आणि तिच्या चेहरा बोलका आहे’, असे मला जाणवले. मी देवीपुढे नतमस्तक झाले आणि देवीला प्रार्थना केली, ‘माझे स्वभावदोष निघून जाऊ देत. साधना आणि धर्मकार्य करण्यासाठी मला शक्ती दे.’ तेव्हा ‘देवीने तिचा हात वर करून आशीर्वाद दिला’, असे मला दिसले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला रामनाथी आश्रमातील दैवी आणि चैतन्यमय वातावरणात रहाण्याची संधी दिली’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’                                                                      (समाप्त)  

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/852192.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक