नवग्रहांच्या मूर्तींची विटंबना !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे नुकतीच आणखी एका मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काही धर्मांध मुसलमान गुंडांनी मंदिरातील नवग्रहांच्या मूर्तींची विटंबना केली. ही घटना शहराच्या शमशाबाद परिसरातील एका मंदिरात घडली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकांनी मंदिराबाहेर जमून आक्रमणाचा निषेध केला. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोचले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
The Union Minister of State for Home Affairs, @bandisanjay_bjp, strongly condemns the back-to-back attacks on Hindu Temples in Telangana
He expressed deep concern over the Congress govt’s silence regarding repeated attacks on Hindu temples, drastic increase in Love J!h@d… https://t.co/SJIqW0o7x8 pic.twitter.com/FuL7j3jEtH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 5, 2024
काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी भाग्यनगरमधील कुर्मागुडा येथील मुथ्यालम्मा मंदिरावर आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली होती. या घटनेनंतरही स्थानिक हिंदूंनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. मूर्तीची विटंबना करणार्या एका आरोपीला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकायाऐवजी एखाद्या मशिदीत अथवा दर्ग्यावर असे आक्रमण करण्यास कुणी धजावले असते, तर एव्हाना संपूर्ण देशात ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देऊन हिंसाचार माजला असता. हिंदू कायदा हातात घेत नसल्यानेच त्यांच्या अतीचांगूलपणाचा मुसलमान, तसेच प्रशासन अपलाभ उठवतात का ? |