संपादकीय : हलाल लादणार्‍यांना ‘जय श्रीराम’; मात्र नको !

रुग्णांच्या नातेवाइकांना विनामूल्य भोजन देणारा वृद्ध व वाद घालणारी मुस्लिम महिला

हल्लीच काही दिवसांपूर्वी मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांना विनामूल्य भोजन देत असलेल्या एका वृद्ध हिंदु व्यक्तीने भोजन घेतांना ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितले; म्हणून एका मुसलमान महिलेने वाद घातला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित करून ‘हिंदू मुसलमानांचा किती  द्वेष करतात’, असे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) निर्माण करण्यात आले. ‘दान हे धर्म पाहून करू नये’, असे फुकाचे तत्त्वज्ञानही अनेकांनी सामाजिक माध्यमांवरून पाजळले; परंतु मागील काही वर्षांपासून औषधे, सौंदर्य प्रसाधने यांसह अन्नापासून सर्व जीवनपयोगी साहित्य हलाल प्रमाणित करून ते हिंदूंना घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘थूंक जिहाद’द्वारे अन्नपदार्थांमध्ये थुंकून ते हिंदूंना खायला घातले जात आहे. त्याविषयी मात्र हे कथित धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि तथाकथित विचारवंत बोलायला सिद्ध नाहीत. हिंदूंच्या सहस्रावधी मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवून अनेकांच्या श्रद्धा वालकरप्रमाणे निर्घृण हत्या धर्मांध मुसलमानांनी केल्या आहेत. सर्व मुसलमान जिहादी किंवा धर्मांध नाहीत, हे जरी खरे असले, तरी या घटनांविषयी कधीतरी या मंडळींनी मुसलमानांना तत्त्वज्ञान शिकवायचा प्रयत्न तरी केला आहे का ? एका वृद्ध हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितल्यावर मात्र ही सर्व मंडळी हिंदूंना मानवतावाद शिकवायला लागली आहेत. आतापर्यंत हिंदूंची श्रद्धास्थाने आणि भारतभूमी यांचा आदर करायला हिंदूंनी मुसलमानांवर कधीच बळजोरी केलेली नाही; मात्र ही उदारता हिंदूंच्याच अंगलट आली आहे. ‘जय श्रीराम’ म्हणून जेवण घेण्याने मुसलमान महिलेचे काहीही बिघडत नव्हते. ‘जय श्रीराम’ म्हणायचे नसेल, तर मग अन्न न घेता त्या महिलेला बाजूला होता आले असते. भोजन देणार्‍या वृद्ध हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हणायला कुणावरही सक्ती केली नव्हती; पण मुसलमान महिलेने जो उन्माद केला, यावरून तिचा श्रीरामाविषयीचा द्वेष उघड झाला.

हिंदूंच्या विरोधातील नियोजित षड्यंत्र !

टाटा रुग्णालयाच्या बाहेर घडलेली घटना हा काही अचानक घडलेला प्रसंग नाही. ज्या पत्रकाराने हा व्हिडिओ चित्रित केला तो पत्रकार अफजल शेख हा मुख्य संपादक असलेल्या ‘मुंबई टी.व्ही.’ या यू ट्यूब चॅनेलचा होता. ही घटना घडण्यापूर्वी त्या पत्रकाराने व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी तेथे स्वत:च कॅमेरा सिद्ध ठेवला होता आणि त्यानंतरच मुसलमान महिलेने वाद घालायला प्रारंभ केला.

यातून हे सर्व नियोजित षड्यंत्र होते, हे लक्षात येते. त्यामुळे वाद घालणार्‍या मुसलमान महिलेने स्वत:ची ओळख उघड होऊ नये, यासाठी आधी ओढणीने स्वत:चा चेहरा पूर्ण झाकला. ही महिला ‘जय श्रीराम’ म्हणणार नाही असे सांगत होती; पण तो वृद्ध हिंदु दान करत असलेले भोजन घेणे हा जणूकाही तिचा मूलभूत अधिकार असल्याप्रमाणे भोजन मागत होती. महिलेने वाद घातल्यानंतर ‘मुंबई टी.व्ही.’च्या पत्रकाराने जाणीवपूर्वक भोजन वाढणार्‍या वृद्ध व्यक्तीला उकसवले. या मुसलमान पत्रकाराने वृद्ध हिंदु व्यक्तीला भोजन घेण्यासाठी येणार्‍यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास पुन:पुन्हा सांगितले आणि त्याचे चित्रण केले. या प्रकारानंतर दुसर्‍या दिवशी याच ठिकाणी मुसलमानांनी स्वत:कडून भोजनाचे विनामूल्य वाटप केले आणि हे भोजन सर्व धर्मियांसाठी असल्याचे आवर्जून सांगितले. या सर्वांचे चित्रीकरण ‘मुंबई टी.व्ही.’ने केले आणि मुसलमानांचे दान हे धर्म पाहून नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता ‘मुंबई टी.व्ही.’ यू ट्यूब चॅनेलवरून टाटा रुग्णालयाच्या बाहेर विनामूल्य भोजनाचे वाटप करणार्‍या मुसलमान व्यक्तीची विशेष मुलाखतही प्रसारित केली. त्यानंतर विविध सामाजिक माध्यमांतून मुसलमानांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित केला, यातून मुसलमानांचे हिंदुविरोधी षड्यंत्र उघड होते. त्याचप्रमाणे मुसलमान कुठच्याही उच्च पदावर असले, उच्चशिक्षित असले आणि या घटनेतून पत्रकार असले, तरी हिंदूंच्या विरोधात कसे षड्यंत्र रचून स्वतःची धर्मांधता दाखवून देतात, याची प्रचीती येते. हिंदूंनी हे लक्षात घेऊन सावधगिरीने वागायला हवे !

हलाल प्रमाणित वस्तू हिंदूंवर थोपवणे, ही धर्मनिरपेक्षता का ?

काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी हिंदु वृद्धाने केलेले कसे चुकीचे आहे, अशी सामाजिक माध्यमांवर कोल्हेकुई चालू केली. ‘जय श्रीराम’ म्हणायला मुसलमानांचा धर्म आड येत असेल, तर मग मुसलमान हिंदूंना हलाल प्रमाणित वस्तू घेण्यास भाग का पाडतात ? खाद्यपदार्थांपासून ते औषधे, सौंदर्यप्रसाधने, कपडे, इमारती आदी सर्वांमध्ये हलाल प्रमाणित वस्तू आणि उत्पादने घेण्यासाठी हिंदूंवर दबावतंत्र निर्माण केले आहे. या वेळी हिंदूंना ‘हलाल प्रमाणित पदार्थ आणि वस्तू का ?’, याविषयी या भुरट्या चॅनेलवाल्यांनी कधी आवाज का उठवला नाही ? मुसलमानांना ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितल्यावर लोकशाही धोक्यात येते; पण भारतातील कोट्यवधी हिंदूंना हलाल प्रमाणित पदार्थ खायला घातल्याने लोकशाही धोक्यात येत नाही का ? हिंदूंच्या इस्लामीकरणाचा अजेंडा राबवणार्‍यांचा जिहाद हिंदूंनी आणखी किती काळ सहन करायचा ? हिंदूंनी मुसलमानांच्या धर्माचा आदर करावा, असे वाटणार्‍यांनी प्रथम मुसलमानांनी त्यांची धर्मांधता सोडावी, यासाठी त्यांना उपदेश करावा, मग हिंदूंना उपदेशाचे डोस पाजावेत.

दान हे सत्पात्री असावे !

दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, धर्मांतर, थूंक जिहाद, आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ? ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगणारा वृद्ध हिंदु निश्चितच दोषी कसा काय ? मुसलमान भारतमूमीला वंदन करत नाहीत, ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ या घोषणा न देता ‘जय पॅलेस्टाईन’ या घोषणा देतात. हिंदूंना नष्ट करून भारतभूमीला इस्लामी राष्ट्र बनवण्याची स्वप्ने मुसलमान पहात असतील आणि केवळ एका भोजनापुरते ‘जय श्रीराम’ म्हणून हिंदूंच्या देवतांचा आदर करायला विरोध करत असतील, तर अशांना भोजन का म्हणून द्यावे ? भूतदया ही मानवतेप्रती असावी, धर्मांधांना भूतदया दाखवल्याचा परिणाम जर हिंदूंच्याच जिवावर उठणारा असेल, तर अशी भूतदया हिंदूंनी स्वप्नातही अंगीकारू नये. भोजन देतांना ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगणे हे वरकरणी भूतदयेच्या विरोधात वाटत असले, तरी हिंदूंवर असे करण्याची वेळ का आली ? याचा विचार भूतदयेची वार्ता करणार्‍यांना येत नसेल, तर तो त्यांचा ढोंगीपणा आहे.

हिंदूंनो, मुख्य संपादक मुसलमान असलेल्या ‘मुंबई टी.व्ही.’ या यू ट्यूब चॅनेलची धर्मांधता जाणा !