Vivek Ramaswami : भारतीय वंशाचे अमेरिकी नेते विवेक रामास्वामी यांनी ट्रम्प प्रशासनातील दायित्वाचे दिले त्यागपत्र !

भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती आणि राजकारणी विवेक रामास्वामी विवेक रामास्वामी

नवी देहली – भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती आणि राजकारणी विवेक रामास्वामी यांनी डॉनल्ड ट्रम्प सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (डओजीई) या विभागाचे त्यागपत्र दिले आहे. या निर्णयामागे विवेक रामास्वामी यांना ओहायो राज्याच्या राज्यपालपदाची निवडणूक लढवायची आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच सरकारकडून ही माहिती देण्यात आली. तथापि राज्यपाल पदासाठी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

या संदर्भात रामास्वामी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ‘डीओजीई’ची निर्मिती करण्यास साहाय्य करणे हा एक सन्मान होता. मला निश्‍चिती आहे की, इलॉन मस्क आणि त्यांचे पथक सरकारला सुव्यवस्थित करण्यात यशस्वी होतील. ओहायोमधील माझ्या भविष्यातील योजनांबद्दल मला लवकरच अधिक सांगायचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यास साहाय्य करण्यास सिद्ध आहोत.