२ वेण्या बांधून येण्याचा दिला आदेश
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील जनता इंटर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हिजाब घालून महाविद्यालयात येणार्या विद्यार्थिनींना बाहेर काढले. प्राचार्य हिजाब घालून महाविद्यालयात येऊ देत नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. सामाजिक माध्यमांतून या घटनेचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. या संदर्भात शिक्षण जिल्हा निरीक्षकांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली असून आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत.
व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी हिजाब आणि गणवेश परिधान केलेल्या दिसत आहेत. त्या म्हणत आहेत की, त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना हिजाबमुळे महाविद्यालयातून हाकलून दिले. त्यांना हिजाब न घालता २ वेण्या बांधून महाविद्यालयात येण्यास सांगितले आहे.
Girls who came to the college wearing Hijab sent back by the Principal
📍Bijnor, Uttar Pradesh
Instructs to come with their hair in two braids
Despite the presence of a prescribed uniform in schools and colleges, if someone wears different attire, a law should now be made to… pic.twitter.com/h3JSZGqDmK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 14, 2024
संपादकीय भूमिकाशाळा आणि महाविद्यालय यांचा गणवेश असतांनाही जर कुणी अन्य वेश परिधान करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई करण्याचा कायदाच आता केला पाहिजे ! |