शाळेत हमासचे आतंकवादी लपल्यावरून कारवाई
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या दराज जिल्ह्यातील एका शाळेवर केलेल्या आक्रमणात १०० हून अधिक लोक ठार झाले. या शाळेत अनेकांनी आश्रय घेतला होता. सकाळी नमाजपठण करत असतांना शाळेवर रॉकेट डागण्यात आले. यापूर्वीही इस्रायलने गाझामधील २ शाळांवर आक्रमणे केली आहेत. इस्रायलच्या सैन्याने म्हटले की, या शाळेचा वापर हमासचे कार्यालय म्हणून केला जात होता. तेथे हमासचे अनेक आतंकवादी उपस्थित होते.
इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४१ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात १६ सहस्रांहून अधिक मुले आहेत. (इतका नरसंहार होऊनही अद्याप हमासने शरणागती पत्करलेली नाही आणि इस्रायलच्या ओलिसांचीही सुटका केलेली नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)