Israel Hamas Ceasefire : हमासने ३ ओलिसांना सोडले आणि इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची केली सुटका !

इस्रायल-हमास युद्धबंदी कराराची कार्यवाही चालू !

तेल अविव – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार लागू झाल्यानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच हमासने ३ इस्रायली बंधकांना सोडले, तर इस्रायलकडून ९० पॅलेस्टिनींना सोडण्यात आले.

१. इस्रायलने सोडलेल्या पॅलेस्टिनींमध्ये अनेक महनीय व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये पॅलेस्टिनी डाव्या गटाच्या ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’च्या प्रमुख ६२ वर्षीय खालिदा जरारा यांचा समावेश आहे. यासह हमासचा अधिकारी सालेह अरोरी याची बहीण दलाल खासीब आणि नेते अहमद सादत यांची पत्नी अबला अब्देल रसूल यांचा समावेश आहे.

२. युद्धबंदी करारानुसार आता टप्प्याटप्प्याने ओलिसांची सुटका करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

३. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आक्रमणाने चालू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात सहस्रावधी लोकांनी त्यांचे प्राण गमावले. या युद्धाच्या कालावधीत इजिप्त, कतार, अमेरिका अशा अनेक देशांनी दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला. अंततः १५ जानेवारी या दिवशी इस्रायलने युद्धबंदी करार स्वीकारला आणि ओलिसांची सुटका करण्यास सहमती दर्शविली.