Hajj Death Mecca : आतापर्यंत हज यात्रेतील १ सहस्र ३०१ यात्रेकरूंचा मृत्यू

सहस्रो यात्रेकरू अवैधरित्या मक्केला पोचले !

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियात हज यात्रेमध्ये आतापर्यंत १ सहस्र ३०१ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी सौदी अरेबियाने घोषित केली. यातील बहुतांश लोक अवैधरित्या मक्का आणि मदिना येथे आले होते.

त्यांच्या मृत्यूमागे अतीउष्णता हे कारण असल्याचे सौदीने सांगितले. मृतांपैकी बहुतेक वृद्ध होते किंवा ते कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. सध्या १८ लाख यात्रेकरू हजसाठी सौदीला पोचले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ६५८ इजिप्तच्या हज यात्रेकरूंपैकी ६३० जणांकडे व्हिसा (परदेशी नागरिकांना देशात रहाण्याची अनुमती) नव्हता.