MF Hussain’s Painting To Be Seized : हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

  • हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीचा परिणाम !

  • देहलीच्या ‘दिल्ली आर्ट गॅलरी’ने भरवले होते चित्रप्रदर्शन

नवी देहली – देहलीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी श्री गणेश आणि श्री हनुमान यांची चित्रे जप्त करण्याचा आदेश दिला आहे. ही चित्रे ‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणावर उद्या, २२ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, दिल्ली आर्ट गॅलरीने अन्वेषण अधिकार्‍यांना चित्रांची सूची सादर केली आहे, ज्यामध्ये वादग्रस्त चित्रे अनुक्रमांक ६ आणि १० मध्ये सूचीबद्ध आहेत.

देहली पोलिसांची हिंदुद्वेषी भूमिका

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या या प्रकरणाच्या अन्वेषण अहवालात म्हटले आहे की, ‘हे प्रदर्शन एका खासगी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि या चित्रांचा उद्देश केवळ कलाकारांच्या मूळ कलाकृतींचे प्रदर्शन करणे हा होता’; मात्र न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचिकाकर्त्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांचा अर्ज मान्य करत आक्षेपार्ह चित्रे जप्त करण्याचा आदेश दिला. (यातून पोलिसांची मानसिकता लक्षात येते ! या ठिकाणी अन्य धर्मियांच्या भावना दुखावणारी चित्रे असती, तर पोलिसांनी असेच उत्तर दिले असते का ? दुसरीकडे अन्य धर्मियांनी पोलिसांकडे न जाताच या आर्ट गॅलरीवर आक्रमण करून कदाचित् एखाद्याचे ‘सर तन से जुदा’ही (शिरच्छेदही) केले असते ! – संपादक)


हे ही वाचा → HJS Protests Against MF Husain Paintings : हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर ‘दिल्ली आर्ट गॅलरी’मधील हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेली देवतांची नग्न चित्रे गुपचूप हटवली !


काय आहे प्रकरण ?

डिसेंबर २०२४ मध्ये हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे दिल्ली आर्ट गॅलरीतील प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आक्षेप घेतला होता. यावर या आर्ट गॅलरीने अशी चित्रे ठेवण्यात आल्याचे नाकारले होते. गॅलरी व्यवस्थापनाने वादग्रस्त चित्रे गुपचूप काढून टाकली होती. यावर समितीने पोलिसांत तक्रार केली होती. हिंदुत्वनिष्ठांनी आर्ट गॅलरीच्या सी.सी.टी.व्ही.चे चित्रीकरण तपासण्याची मागणी केली होती. या प्रकरणी अमिता सचदेवा यांनी पटियाला हाऊस न्यायालयात याचिकाही प्रविष्ट (दाखल) केली होती. या आर्ट गॅलरीवर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणीही केली.  त्यावर न्यायालयाने सुनावणी करतांना सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याचा पोलिसांनी आदेश दिला होता. यानंतर पोलिसांनी आर्ट गॅलरीकडून केवळ दोनच चित्रीकरण (फुटेज) कह्यात घेतले. हे अधिवक्ता सचदेवा यांना लक्षात आल्यावर त्यांनी न्यायालयाला याविषयी सांगितले. त्यावर न्यायालयाने सी.सी.टी.व्ही.चा रेकॉर्डर जप्त करण्याचाच आदेश दिला. उद्या आर्ट गॅलरीवर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीवर सुनावणी केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देशात हिंदूंच्या देवतांची अवमानकारक चित्रे अन्य धर्मियांकडून रेखाटली जातात आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदूंना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो, हे हिंदूंनाच लज्जस्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !