सद्गुरु नंदकुमार जाधवकाका, तुमच्या कृपेने ‘साधना हेच सत्य’ हे ओळखण्यास मी सिद्ध होईन ।

ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (१४.६.२०२४) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्य येथे दिले आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चरणी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

कु. प्रियांका शिंदे

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका, तुम्ही सांगता, ‘साधना हेच सत्य’ हे ओळखण्यास मी सिद्ध होईन ।
मन अन् बुद्धी अर्पण करण्यास देव आता शक्ती देईल’ ।। १ ।।

आनंद घेण्यास झोळी तुमच्या समोर पसरून राहीन ।
आवाहन देण्यास येईल माया, लढत पुढे चालत राहीन ।। २ ।।

प्रत्येक पायरीवरून पुढे तुमचे बोट धरून चालत राहीन ।
जेव्हा वाटेल अशक्य सारे, पुन्हा तुम्हाला शरण येईन ।। ३ ।।

– कु. प्रियांका शिंदे, नाशिक (१६.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक