Trekkers Die In Uttarkashi : उत्तरकाशीत थंडीमुळे ५ गिर्यारोहकांचा मृत्यू  

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला. या गटामधील १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

उर्वरितांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत; मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यामध्ये अडचणी येत आहेत. या गटामध्ये कर्नाटकातील १८, महाराष्ट्रातील १ आणि अन्य ३ स्थानिक मार्गदर्शक गिर्यारोहक आहेत.