तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !

सातारा, २४ मे (वार्ता.) – इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांकडून ३ जूनपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.