प्रथम वंदितो श्री गजानना ।
वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन ।
पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
चुका दोषांस्तव येथील या पामराच्या ।
क्षमा प्रार्थितो श्रीराम तथा रामभक्तांच्या ।। ३ ।।
त्रेतायुगात श्री रघुनंदन ।
ज्यांचे करावे नित्य प्रातःस्मरण ।। ४ ।।
जीवन राहिले आदर्श व्यापून ।
आदर्शाच्या परिसीमा ओलांडून ।। ५ ।।
आदर्श पुत्र, आदर्श भ्राता ।
आदर्श भर्ता, आदर्श पिता ।। ६ ।।
आदर्श शत्रू, आदर्श मित्र ।
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सर्वत्र ।। ७ ।।
आज रामनवमी शुभ दिनी ।
कोटी कोटी प्रणाम प्रभु श्रीराम चरणी ।। ८ ।।
रामराज्य स्थापना तथा हिंदु राष्ट्र ।
प्रतीक्षा तळमळ केवळ एकमात्र ।। ९ ।।
स्वातंत्र्यविरांचे स्वप्न हे सत्यात येवो झणी ।
हीच प्रार्थना केवळ आमुची प्रभु श्रीरामचरणी ।। १० ।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.४.२०२४)