साधकांना प्रसाद देण्याची सेवा करणार्‍या सौ. वर्धिनी गोरल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत अनुभवलेली भगवंताची कृपा !

सौ. वर्धिनी गोरल

१. ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळातील सेवा भगवंतच करवून घेत असल्याचे अनुभवणे 

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सेवेची व्याप्ती पुष्कळ असते; पण त्या वेळी ‘भगवंताने सर्व सेवा करून घेतल्या’, असे प्रत्येक क्षणी मला अनुभवता आले.

२. सेवा करतांना व्यष्टी साधनेचेही प्रयत्न होऊन सर्वच साधकांना आनंद मिळणे

प्रसाद देण्याची सेवा करतांना माझा नामजप सतत होत होता. भावजागृतीचे प्रयत्न करणे, सेवा करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी प्रयत्न भगवंतच माझ्याकडून करून घेत होता. या कालावधीत कोणत्याच सेवेत अडचण आली नाही. सेवेत सहभागी असलेल्या अन्य साधकांनी देखील पुष्कळ साहाय्य केले. सर्वजण आनंदाने सेवा करत होते.

३. ‘भगवंतच सर्व सेवा नियोजनानुसार करून घेत आहे’, अशी अनुभूती येणे

या वर्षी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला जोडूनच गुरुपौर्णिमा महोत्सव आला होता. त्याचीही सेवा सलग चालू होती. ‘हे सर्व भगवंत करून घेत आहे’, असे माझ्या लक्षात येत होते. सेवांचे नियोजन केल्याप्रमाणे सर्व सेवा होत होत्या.

‘भगवंता, आमच्याकडून प्रत्येक क्षणी तुझी सेवा करून घे. आमच्यामध्ये कोणताच कर्तेपणा येऊ देऊ नकोस. भगवंता, मला तुझ्या सेवेत अखंड रहाता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक