अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेले स्वागतफलक ठरत आहेत लक्षवेधी !

अद्याप अन्य राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे फलक नाही !

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

अयोध्येतील नाका चौकात लावण्यात आलेला स्वागतफलक

अयोध्या – श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी लावलेले  स्वागतफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बहुतांश फलक हे अयोध्येच्या विविध प्रवेशद्वारांवर लावण्यात आले आहेत. सुल्तानपूरहून अयोध्येत प्रवेश करतांना लागणार्‍या नाका चौकातील स्वागतफलक लक्ष वेधणारा आहे.

फलकावर मध्यभागी मोठ्या आकारात भगवान श्रीरामाचे चित्र असून त्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वरच्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे आहेत. खाली ‘रामलला के दर्शन लिए आए हुए सभी रामभक्तों का हार्दिक स्वागत’ असे लिहिण्यात आले असून त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. असा स्वागतफलक लावणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. संपूर्ण अयोध्येत अद्याप अन्य राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्याने अशा प्रकारे फलक लावल्याचे दिसून आलेले नाही.