कॅनडामध्ये पाकिस्तानी बलुच, सिंधी आणि पश्तून प्रांतातील नागरिकांकडून पाक सरकारच्या विरोधात निदर्शने !

टोरोंटो (कॅनडा) – कॅनडामध्ये रहाणार्‍या पाकिस्तानमधील बलुच, सिंधी आणि पश्तून प्रांतातील नागरिकांकडून पाक सरकारच्या विरोधात ६ जानेवारीला निदर्शन केली. या नागरिकांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये सहस्रो बलुच नागरिकांना गायब करण्यात आले आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि होणार्‍या हत्या यांस पाकिस्तान सरकार उत्तरदायी आहे. या आंदोलनाचे आयोजन ‘बलुच ह्युमन राइट्स काऊन्सिल ऑफ कॅनाडा’, ‘वर्ल्ड सिंधी काऊन्सिल’ आणि ‘पश्तून काऊन्सिल कॅनाडा’ यांनी संयुक्तपणे केले होते. सध्या पाकिस्तानमध्ये बलुच नागरिकांकडून सहस्रोंच्या संख्येने इस्लामाबादच्या दिशने कूच केली जात आहे. त्यांच्याकडून सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहे.