Indian Air Force : भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात धावपट्टीवर उतरवले विमान !

भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात ‘सी-१३० जे’ हे विमान धावपट्टीवर सुखरूप उतरवले !

कारगिल (लडाख) – येथे भारतीय वायूदलाने रात्रीच्या अंधारात ‘सी-१३० जे’ हे विमान धावपट्टीवर उतरवले. भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात अशा प्रकारे धावपट्टीवर विमान सुखरूप उतरवले. 

या विमानात काही सैनिकही होते. या घटनेची माहिती वायूदलाने त्याच्या ‘एक्स’ खात्यावरून व्हिडिओ प्रसारित करून दिली. कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते.