Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी अद्याप मागे घेतलेली नाही !

हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

म्हैसुरू (कर्नाटक) – राज्यात आम्ही हिजाबबंदी अद्याप मागे घेतलेली नाही. यावर मला प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी उठवण्याविषयी प्रशासन चाचपणी करत आहे. सरकारी पातळीवर यासंदर्भात पुरेशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी सारवासारव करणारी भूमिका कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली. २ दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी शिक्षणसंस्थांमध्ये लागू करण्यात आलेली हिजाबबंदी मागे घेतल्याची घोषणा केली होती. याला हिंदु संघटनांकडून विरोध झाल्यावर सिद्धरामय्या यांनी वरील प्रकारे सारवासारव केली आहे.

सिद्धरामय्या यांनी म्हटले होते, ‘शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे, कपड्यांची आणि अन्नाची निवड ही वैयक्तिक असेल.’ त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी मागे घेतल्याची चर्चा चालू झाली होती.