पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
साष्टांग नमस्कार सद्भावे ।
तुझ्या मंगल चरणांशी ।। १ ।।
लई नाही लई नाही ।
मागणे श्री विठुराया ।।
कटीच्या हाती घेऊनी शस्त्र ।
नाश करी दुष्टांचा सदया ।। २ ।।
महाराष्ट्राचे तू आराध्य दैवत ।
गेल्या अनेक वर्षांत झाली ।।
महाराष्ट्राची दुर्दशा दैना ।
तू तुझ्या डोळ्याने पाहिली ।। ३ ।।
हे दयाघना श्री विठुराया ।
नम्र प्रार्थना करितो सदया ।।
वारकर्यांना बळ आणि शक्ती दे ।
राष्ट्र-धर्माचे पुनर्स्थापन करण्या ।। ४।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.११.२०२३)