जीवन याला म्हणावे ।

श्री. अशोक लिमकर

शरीर चांगले ठेवा ।
डोके थंड ठेवा ।
ओठांवर हसू ठेवा  ।
डोळ्यांत आदर ठेवा ।। १ ।।

बोलणे नम्र ठेवा ।
मनामध्ये दया ठेवा ।
रागावर नियंत्रण ठेवा ।
व्यवहार स्वच्छ ठेवा ।। २ ।।

मुखी सदा नाम ठेवा ।
स्वतःला सत्संगात ठेवा ।
मनाला धर्माचरणात ठेवा ।
राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात शरीर अन् मन झिजवा ।। ३ ।।

सर्वांशी प्रीतीने वागा ।
संघभाव आणि बंधुभाव ठेवा ।
नको कुणाशी हेवादावा ।
‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (टीप) ध्येय ठेवा ।। ४ ।।

टीप – वसुधैव कुटुम्बकम् : ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, या भावाने वागणे.

– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१०.२०२४)