जाती, वर्ण, लिंग, सर्व भेद विसरूनी ‘एकीचे बळ’ वाढवूया । 

‘जाती निर्मूलनासाठी अनेक वर्षे समाजसुधारक, साम्यवादी, राजकारणी अशा अनेकांनी प्रयत्न केले; मात्र समाजाच्या स्थितीत अपेक्षित पालट झालेला दिसत नाही; कारण ‘आरक्षण’ आणि ‘जातीच्या राजकारणा’ला खतपाणी घातले जात आहे.

      अशी समाजाची स्थिती असतांना मला या जटील प्रश्नाचे उत्तर मिळाले. माझा सनातन संस्थेशी ३० वर्षांपूर्वी संपर्क आला. मी मागासवर्गीय असूनही कसलाही भेदभाव न ठेवता संस्थेने माझ्याकडून साधना करवून घेतली. माझ्यावरील जातीभेदाचा कलंक पुसून मला साधनेचे अमृत पाजले.

पू. शिवाजी वटकर

सरकार सांगते जातीभेद संपवा ।
समाजसुधारक सांगतो जात-पात पाहू नका ।। १ ।।

तरीही लागते जात, शाळेत प्रवेश घेतांना ।
लाभदायक असते जात, सरकारी चाकरी करतांना ।। २ ।।

जात लागते लोकप्रतिनिधी निवडतांना ।
जात लागते आरक्षणाचे राजकारण करतांना ।। ३ ।।

कशा नष्ट होणार जाती ? लोक भ्रमात रहाती ।
सारेच सामाजिक आदर्श रद्दीत जाती ।। ४ ।।

शोधत होतो उत्तर मी जाती-निर्मूलनाच्या प्रश्नाला ।
श्री गुरूंच्या (टीप १) रूपात भगवंत मला भेटला ।। ५ ।।

दिले मजला ब्राह्मतेज नि क्षात्रतेज, साधनेचे अमृत पाजूनी ।
सनातन संस्था करी उद्धार जातीचा कलंक पुसूनी ।। ६ ।।

जाती, वर्ण, लिंग, सर्व भेद विसरूनी ‘एकीचे बळ’ वाढवूया ।
भक्तीभाव वाढवून सुराज्य, सुसंस्कृत ‘हिंदु राष्ट्रा’चे पाईक होऊया ।। ७ ।।

टीप १ – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.