झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील दंडात्मक कारवाईला दिली तात्कालिक स्थगिती !

पंतप्रधान मोदी यांची मानहानी केल्याचे प्रकरण


रांची (झारखंड) –
झारखंड उच्च न्यायालयाने ४ जुलै या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात होणार्‍या दंडात्मक कारवाईला तात्कालिक स्थगिती दिली आहे. १६ ऑगस्ट या दिवशी यासंदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ? गांधी यांनी पंतप्रधानांची मानहानी केलेल्या या वक्तव्याच्या विरोधात देशभरात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.

सूरत येथील न्यायालयाने याआधी गांधी यांना या प्रकरणी २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावरून त्यांची खासदारकी रहित झाली आहे.