तेजस्वी आणि हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा ज्ञानसूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझे हृदय बोलू लागले आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. एक अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. ‘प्रचंड बुद्धीमत्ता, सखोल अभ्यास, नामजपाने आलेले तेज, ध्यानातून सापडलेले तत्त्व आणि आजूबाजूला वावरत असलेली तरुण ऊर्जा’, या सर्व अलंकारांनी सजलेला एक तेजस्वी ज्योतीर्मयस्वरूप; हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा एक ज्ञानसूर्य माझ्यासमोर प्रगटला होता.  – सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक