भारतमातेचे पुत्रच तिचे वैरी !

‘सध्‍या आपल्‍या देशात जे राजकीय वातावरण निर्माण होत आहे, ते समाधानकारक नाही. अशा वातावरणामुळे आपल्‍या देशाची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होऊ शकते. गेल्‍या मासात महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादी काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान अत्‍यंत धोकादायक आहे. शरद पवारांनी त्‍यांच्‍या अनुयायांना सांगितले, ‘‘मोदींचा पराभव करण्‍यासाठी मुसलमानांना मतदान करायला लावा. त्‍यासाठी मेलेल्‍या मुसलमानांना जिवंत करून मतदान करा.’’ एका राजकीय पक्षाच्‍या अध्‍यक्षपदावरून पवारांनी केलेले विधान हे राष्‍ट्रघातकी आहे. त्‍यांच्‍या या विधानाच्‍या २ बाजू आहेत. त्‍या आपण समजून घेतल्‍या पाहिजेत.

श्री. दुर्गेश परुळकर

१. घुसखोर मुसलमानांना मतदान करायला लावणे, हे देशाच्‍या स्‍वातंत्र्याला बाधा निर्माण करणारे !

आपल्‍या देशात बाहेरच्‍या देशातील मुसलमानांनी घुसखोरी केली आहे. त्‍यांना या देशाचे नागरिकत्‍व देण्‍यात यावे; म्‍हणून अनेक राजकीय पक्षांनी अवैधपणे प्रयत्न चालू केले आहेत. त्‍यांना आधार कार्ड, शिधापत्रक मिळवून देण्‍याचे कुकर्म केल्‍याचे यापूर्वीच काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्‍यांचे नाव मतदारांच्‍या सूचीत समाविष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘अशा प्रकारे जे देशाचे नागरिक नाहीत, अशा मुसलमानांना मतदानासाठी शरद पवारांना पाचारण करायचे आहे का ?’, हा प्रश्‍न उपस्‍थित होतो. म्‍हणूनच शरद पवारांनी केलेले विधान राष्‍ट्रघातकी आहे. अशा घुसखोरांची हिंदुस्‍थानवर निष्‍ठा असूच शकत नाही. त्‍यामुळे भविष्‍यात हेच घुसखोर देशाच्‍या स्‍वातंत्र्याला आणि सार्वभौमत्‍वाला बाधा निर्माण करू शकतात.

२. मोदींना पराभूत करण्‍यासाठी बनावट मतदान करण्‍याचा कुटील डाव

मृत झालेल्‍या मुसलमानांना सुद्धा मतदानासाठी पाचारण करण्‍यास पवार सांगतात. मृत झालेली व्‍यक्‍ती मतदान करायला येऊ शकत नाही; कारण ती या जगातच नाही, म्‍हणजे मृत झालेल्‍या मुसलमानांच्‍या जागी कुणीतरी दुसरी व्‍यक्‍ती मतदान करणार आहे. याचाच अर्थ शरद पवारांनी उघड उघड बनावट मतदान करून मोदींना पराभूत करण्‍याचा कुटील डाव राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीत मांडला आहे. मृत व्‍यक्‍तीच्‍या नावाने मतदान करणे, हा दंडनीय अपराध आहे. असा अपराध करण्‍यास प्रोत्‍साहन देणे अथवा प्रवृत्त करणे, हाही एक भयंकर अपराध आहे. तसा अपराध शरद पवार यांच्‍याकडून घडला आहे, असे म्‍हणण्‍यास पुरेसा वाव आहे.

३. भारतमाता तिच्‍याशी वैरभाव बाळगणार्‍या तिच्‍याच पुत्रांच्‍या गराड्यात अडकली ?

मोदींचा पराभव करण्‍यासाठी शरद पवारांनी निवडलेला मार्ग हा राष्‍ट्रहिताचा नाही. त्‍यामुळे भारतमातेचे पुत्र असलेले शरद पवार आपल्‍याच मायभूमीशी वैरभावनेने वागत आहेत आणि तशी वैरभावना ते आपल्‍या अनुयायांच्‍या मनात निर्माण करत आहेत. राजकीय पक्षाच्‍या नेत्‍याला ही गोष्‍ट भूषणास्‍पद नाही. शरद पवारांप्रमाणे देशातील अनेक राजकीय पक्षांचे नेते राष्‍ट्रघातकी विचार करून सत्ता काबीज करण्‍याचा प्रयत्न करणार नाहीत, याविषयी खात्री देता येत नाही. या गोष्‍टीवरून भारतमाता तिच्‍याशी वैरभाव बाळगणार्‍या तिच्‍याच पुत्रांच्‍या गराड्यात अडकली आहे.

४. वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीपर्यंत देशात शांतता आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राहील ना ?

जगातील इस्‍लामी समाज हिंदुस्‍थानचे इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर करण्‍यासाठी धडपडत आहे. देशातील काही फुटीरतावादी लोकांनी त्‍यांच्‍या बाजूने कौल दिला आहे. हिंदुस्‍थानच्‍या स्‍वातंत्र्याला १०० वर्षे जेव्‍हा पूर्ण होतील, त्‍या वेळी हा देश ‘इस्‍लामी राष्‍ट्रा’त रूपांतरित करण्‍याचे मनोगत या आधी अनेक वेळा व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर शरद पवारांसारख्‍या एका माजी केंद्रीय मंत्र्याने आणि भूतकाळात महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झालेल्‍या जाणत्‍या नेत्‍याने अशा प्रकारचे विधान करून देशातील राजकीय वातावरण पार नासवले आहे.

‘भारतमातेचे शत्रू देशात आणि देशाबाहेरही आहेत’, असा निष्‍कर्ष जर कुणी काढला, तर तो चुकीचा ठरणार नाही. ‘वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीपर्यंत आपल्‍या देशात शांतता आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राहील का ?’, असा प्रश्‍न अशी शंका देशाच्‍या नागरिकांमध्‍ये निर्माण झाली, तर त्‍यात नवल वाटण्‍याचे कारण नाही.

५. देश रक्षणासाठी सुजाण नागरिकांनी मतदानाच्‍या अधिकाराचा उपयोग करणे आवश्‍यक !

पाणी अग्‍नीचा शत्रू आहे. पाण्‍याच्‍या संपर्कात अग्‍नी आल्‍यानंतर पाणी कितीही तापलेले असले, तरी ते अग्‍नीचे अस्‍तित्‍व नष्‍ट करून टाकते. शरद पवारांसारख्‍या कसलेल्‍या राजकीय नेत्‍याला ही गोष्‍ट कळत नसली, तरी देशाच्‍या सुजाण नागरिकांनी हे जाणून वेळीच सावध राहून राज्‍यघटनेने दिलेल्‍या मतदानाच्‍या अधिकाराचा योग्‍य उपयोग करावा आणि आपल्‍या भारतमातेचे तिच्‍या शत्रूंपासून रक्षण करावे.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (५.३.२०२३)

संपादकीय भुमिका

देशात राहून देशाच्‍या विरोधात बोलणार्‍या लोकप्रतिनिधींना राष्‍ट्रप्रेमींनी मतदानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांची जागा दाखवून द्यावी !