Bhiwandi Bangladeshi Infiltrators Arrested : भिवंडीतून २५ दिवसांत २३ बांगलादेशींना अटक !

देहविक्रीमध्ये गुंतल्याचाही आरोप !

भिवंडी – मुसलमानबहुल भिवंडीतून पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशींना अटक केली आहे. काही सहस्र रुपयांमध्ये त्यांनी भारतात घुसखोरी केली असून ते मजुरीसह देहविक्रीच्या व्यापारातही सक्रीय आहेत. देहविक्री प्रकरणात रोझी होवी गायन (वय ३३ वर्षे), बेगम आसमा मोसंमद (वय ४३ वर्षे) आणि रशिदा हनीफ खलिफा (वय ४० वर्षे) यांना भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली, तर शाहीद अब्दुल कलाम अन्सारी या बांगलादेशी नागरिकाला कह्यात घेतले आहे. संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोर भारतात आतंकवादी कारवाया, तसेच गुन्हेगारी कृत्यांद्वारे हिंदूंच्या मुळावर उठले आहेत तर दुसरीकडे बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंचा वंशविच्छेद होण्यासाठी तेथील मुसलमानांनी कंबर कसली आहे. ही स्थिती हिंदूंसाठी लांच्छनास्पद !