तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलमध्ये गेल्या सव्वा वर्षापासून युद्ध चालू आहे. असे असतांनाही या कालावधीत १६ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले. इस्रायलने आणखी सहस्रावधी कामगार आणण्याची योजना आखली आहे. इस्रायलमध्ये भारतीय अनेक वर्षांपासून काम करत आहेत. वृद्ध इस्रायलींची काळजी घेण्यासाठी सहस्रावधी लोक भारतातून तेथे जातात. अनेक भारतीय तेथे हिरे व्यापारी आणि माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणूनही काम करतात. गाझा युद्ध तीव्र झाल्यानंतर इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे.