नवी देहली – भारतीय गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल ३८६ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतात शेणापासून उपलब्ध झाले. ‘एक्झमपेडिया’ या वस्तूंच्या आयात-निर्यातीशी संबंधित विषयांचा अभ्यास करणार्या आस्थापनाने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय गायीचे शेण हे शेतीसाठी संजीवनी ठरते, असे परदेशातील अनेक शेतकरी मानतात. मालदीव, चीन, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्राझिल, अर्जेंटिना आदी देशांत भारतीय गायीचे शेण अथवा तिच्या पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे.
१. ३८६ कोटी रुपयांपैकी जवळपास १२५ कोटी रुपये मूल्याचे निवळ शेण परदेशात निर्यात करण्यात आले.
२. गायीच्या शेणापासून बनवलेले १७३ कोटी रुपये मूल्याचे खतही निर्यात झाले.
३. गायीचे शेण असलेल्या ‘कंपोस्ट खता’चीही वर्षभरात ८८ कोटी रुपयांची निर्यात झाली.

दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी