पुणे येथील वादात सापडलेली ‘हाय स्पिरीट कॅफे’तील मेजवानी रहित !

पब व्यवस्थापकांचा निर्णय; सामाजिक माध्यमांतून टिकेचा सूर !

पुणे – पार्टीच्या (मेजवानीच्या) निमंत्रणासोबत ‘कंडोम’ (निरोध) आणि ‘ओ.आर्.एस्.’चे (क्षारांची पावडर) पाकीट आणि ‘सॅनिटरी पॅड्स’ पाठवणार्‍या मुंढव्यातील ‘हाय स्पिरीट कॅफे’ या पबच्या व्यवस्थापकाने आयोजित करण्यात आलेली मेजवानी रहित करण्याचा निर्णय घेतला. या मेजवानीविषयी शहरातील ‘पब’ विरोधात सर्वांकडून संताप व्यक्त होत होता. सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या प्रकरणी ‘महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस’चे अध्यक्ष अक्षय जैन यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

‘निरोध वाटणे हा गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करत आहोत. जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही निरोधक, सॅनिटरी पॅड्स वाटत आहोत’, असा दावा पब व्यवस्थापकांनी केला होता.