सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करणार !
मुंबई – बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात ३ दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद रहाणार आहे.
या आंदोलनात राज्यभरातील २७ सहस्र ९५१ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. ‘सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी करत सरपंच संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे.