भारतात मुसलमानेतरांचे अस्तित्व शेष रहाण्यासाठी हिंदूंना संप्रदाय आणि सीमा विसरून एकजूट व्हावेच लागेल !

भारतातील धार्मिक दंगली : समस्या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

१९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘तलवारीच्या बळावर जगातील ५७ देश झाले इस्लामिक, मुसलमान आक्रमकांनी भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्यासाठी केलेले प्रयत्न, ‘गजवा-ए-हिंद’चे स्वप्न साकारण्यासाठी धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या आणि देशात अशांतता अन् भयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. 

(भाग ७)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/655311.html

१. उत्तरप्रदेशमध्ये २ मुसलमानांनी भगवा फेटा घालून हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी मजार फोडणे

श्री. शंकर गो. पांडे

भारतातील धर्मांध मुसलमानांना हिंदूंविरुद्ध दंगल भडकावणे  आणि त्यांची हत्या करण्यासाठी  नूपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे निमित्तच केवळ पुरेसे आहे, असे नाही. त्यांना कोणतेही क्षुल्लक कारण यासाठी पुरेसे असते. कोणतेच कारण मिळत नसेल, तर असे कारण धर्मांध मुसलमानांकडून निर्माण केले जाते. यासंबंधात एक बातमी माझ्या वाचनात आली. उत्तरप्रदेशातील बिजनोरे जिल्ह्यामधील शेरकोट पोलीस ठाण्याच्या सीमेत घडलेली ही घटना आहे. या सीमेतील जलाल शाह आणि भुरेशाह या २ मजारींची (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) तोडफोड करण्यात येऊन त्यावरील चादरी जाळण्यात आल्या. ही घटना घडत असतांना काही जागृत हिंदूंनी याची माहिती स्थानिक पोलिसांना तात्काळ दिली. विशेष म्हणजे या माहितीची नोंद पोलिसांनीही वेळ न दवडता घेतली आणि ते घटनास्थळी धावून आले. मजारी फोडणार्‍या दोन्ही भावांना तात्काळ अटक केली. त्यापैकी एकाचे नाव होते आदिल, तर दुसर्‍याचे नाव होते कमाल ! विशेष म्हणजे या दोघा मुसलमान भावांनी डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे बांधले होते. ‘भगवे फेटेधारी दोघा हिंदूंनी आमच्या मजारी फोडल्या’, अशी अफवा पसरवून दंगल भडकावण्याची त्या दोघा मुसलमान भावांची योजना होती; पण काही जागरूक हिंदू आणि पोलिसांची तत्परता यांमुळे हे षड्यंत्र अयशस्वी झाले. हे षड्यंत्र यशस्वी झाले असते, तर या देशातील तमाम हिंदूविरोधी राजकीय पक्ष, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, ढोंगी धर्मनिरपेक्षवादी यांना हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी एक भक्कम कारण मिळाले असते. त्यांनी दिवसरात्र गोंधळ घालून हिंदूंना देश-विदेशात पुरेपूर कलंकित केले असते.

२. मुंबईवर झालेल्या २६/११च्या आक्रमणाच्या वेळी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी केलेला अयशस्वी प्रयत्न

ही घटना वाचल्यानंतर मला मुंबईवर पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी भारतातील त्यांच्या पाठीराख्यांच्या साहाय्याने २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी भीषण आक्रमण करून १७५ निष्पाप लोकांचे प्राण घेतले होते, त्या घटनेचे स्मरण झाले. ‘मुंबईवरील हे आक्रमण ‘हिंदु आतंकवाद्यांनी’च केले होते’, हे भासवण्यासाठी त्या मुसलमान आतंकवाद्यांनी हिंदू नावे धारण केली होती. कपाळावर गंधाचे टिळे लावले होते. हातात भगव्या दोर्‍याचे गंडे बांधले होते. हिंदूंचे सुदैव की, तुकाराम ओंबाळे या शूर शिपायाने प्राणावर उदार होऊन अजमल कसाब या एकमेव आतंकवाद्याला जिवंत पकडले. त्यामुळे हे आक्रमण पाकिस्तानमधील मुसलमान आतंकवाद्यांनी केल्याचे सिद्ध झाले. अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे पाकिस्तान आणि भारतातील पाकिस्तानचे पाठीराखे यांचे षड्यंत्र यशस्वी झाले असते.

३. देशात हिंदू सर्वाधिक असुरक्षित असतांना केली जाणारी कोल्हेकुई

भारतातील धार्मिक दंगलीमुळे आतापर्यंत हिंदूंचीच अपरिमित जीवित आणि वित्त हानी झाली आहे. हिंदु समाज आपल्या मायभूमीतच धर्मांध आणि जिहादी वृत्तीचे मुसलमान, मतांच्या लालसेपायी लाचार असलेले राजकीय पक्ष अन् हिंदुद्वेष्टे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी यांमुळे असुरक्षित झाला आहे. या सर्वांकडून मात्र भारतातील मुसलमान असुरक्षित झाल्याच्या उलट्या बोंबा ठोकल्या जातात. या देशातील हिंदु समाज मुळात शांत, संयमी आणि सहिष्णु आहे. दंगली पेटवून तो स्वतःचेच जीवित आणि वित्त यांची राखरांगोळी करून घेण्याचा अविचार कधीच करणार नाही. हिंदु समाज जेव्हा पेटून उठतो, तेव्हा ती त्याची धर्मांध मुसलमानांच्या क्रूर क्रियेवरची प्रतिक्रिया असते. या देशात मूळ क्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रतिक्रिया देणार्‍यांनाच टिकेचे लक्ष्य बनवले जाते.

४. अन्याय सहन करण्याच्या वृत्तीमुळे हिंदूंची जीवित आणि वित्त यांची होत असलेली अपरिमित हानी !

हिंदु-मुसलमानांच्या धार्मिक दंगलीत नेहमीच हिंदूंचे जीवित आणि वित्त यांची हानी होते. ही हानी कधीही भरून निघणारी नसते. नेहमीच हे असे का घडते ? कारण हिंदु समाज नेहमीच बेसावध असतो. आता त्याने या बेसावधपणाचा त्याग केला पाहिजे. धार्मिक सण हिंदूंचे असो कि मुसलमानांचे, शोभायात्रा हिंदूंच्या असो कि मुसलमानांच्या, मेळावे हिंदूंचे असो कि मुसलमानांचे, या प्रत्येक वेळी हिंदु समाजाने जीवित आणि वित्त यांच्या सुरक्षेची उपाययोजना करून ठेवली पाहिजे. त्याने सरकार, नेते आणि पोलीस यांच्यावर फारसे अवलंबून न रहाता संघटित होऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. दंगलीमध्ये हिंदूंचे जीवित आणि वित्त यांची हानी झाल्यानंतर प्रशासन, नेते अन् पोलीस धावून येतात, हा प्रत्येक दंगलीनंतरचा अनुभव आणि परिपाठ आहे. नंतर या सर्वांकडून दंगलखोरांविरुद्ध काहीतरी थातूरमातूर कारवाईचे नाटक केले जाते. तोपर्यंत हिंदूंची जीवित आणि वित्त यांची जी काही हानी व्हायची असते, ती होऊन गेलेली असते. या हानीची भरपाई सरकारकडून कधीच केली जात नाही.

पोलिसांच्या कार्यवाहीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडून आपला निःपक्षपातीपणा दाखवण्यासाठी दंगलखोर मुसलमानांसह काही निष्पाप आणि प्रतिकार करणार्‍या हिंदूंनाही पकडण्यात येते. एकंदरीत काय, तर हिंदूंनी स्वतःची सतत अन्याय सहन करण्याची सद्गुणविकृती सोडून आक्रमकवृत्ती धारण केल्याविना पर्याय नाही. स्वतःचे आणि आपल्या धर्माचे अस्तित्वच धोक्यात येत असतांना अद्यापही हिंदु समाज सहनशील वृत्तीला कवटाळून बसत असेल, तर त्याला कुणीही वाचवू शकणार नाही. ‘जो दुसर्‍यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ! जो स्वयंचि कष्टत गेला तोच भला’, हे समर्थांचे समर्थ सूत्र हिंदु समाजाने अंगीकारून ते कायम लक्षात ठेवले पाहिजे.

५. हिंदूहित साधणार्‍यांना हिंदूंनी मतदान करणे आवश्यक !

हिंदूंनी स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी स्वतःचे संघटन मजबूत केले पाहिजे. मुसलमान समाज जसा संघटित आहे, तसा हिंदु समाज संघटित नाही; म्हणूनच त्याची काळजी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्याकडून घेतली जात नाही. मुसलमान समाज ज्याप्रमाणे स्वहित जोपासणार्‍यांनाच एकगठ्ठा मतदान करतो, त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदूंचे हित जोपासणारे पक्ष आणि नेते यांनाच एकगठ्ठा मतदान केले पाहिजे. ‘जो हिंदूहित की बात करेगा, वो ही देश पे राज करेगा’, या सूत्राचा त्याने अवलंब केला पाहिजे.

६. दंगल पीडित वा अन्यायग्रस्त हिंदूंच्या मागे समस्त हिंदूंनी संघटितपणे उभे रहाणे अपरिहार्य !

‘दंगलीमध्ये जेव्हा एखाद्या हिंदूची दंगलखोरांकडून हत्या होते, तेव्हा आपल्याच घरचा एक सदस्य ठार झाला. जेव्हा एखाद्या हिंदूंचे घर अथवा दुकान जाळले जाते, तेव्हा आपलेच घर आणि दुकान जाळले गेले’, असे प्रत्येक हिंदूंला वाटले पाहिजे आणि प्रचंड संख्येने त्याने रस्त्यावर उतरून अशा घटनांचा निषेध केला पाहिजे. दंगल पीडित झालेल्या आपल्या समाजबांधवांना सर्वतोपरी साहाय्य करून ‘तुम्ही एकटे नाहीत, तर संपूर्ण हिंदु समाज तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे’, याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. मुसलमानांच्या आतंकवादी कृत्यांचा निषेध करण्यासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरण्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जेव्हा आवाहन गेले जाते, तेव्हा फारच अल्प संख्येने हिंदू रस्त्यावर उतरतात. असा माझाच नाही, तर अनेकांचा अनुभव आहे. यामुळे ‘हिंदू समाज जागरूक आणि संघटित नाही’, असे चित्र समाजात उभे रहाते.

पीडित हिंदूच्या मागे समर्थपणे उभे रहाण्याऐवजी ‘मला काय त्याचे ?’, असे म्हणून अलिप्त रहाणार्‍या हिंदूंनी एक सत्य समजून घेतले पाहिजे. ते असे की, ‘दंगलीत पीडित झालेले हिंदू आज जात्यात आणि आपण सुपात असलो, तरी उद्या आपणही जात्यात भरडले जाणार आहोत’, हे नक्की ! उद्या आपण जात्यात भरडले जाऊ नये, असे हिंदूंना वाटत असेल, तर हिंदू समाजाने तात्काळ संघटित होऊन स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे.

७. … असे राजकीय पक्ष आणि नेते यांना हिंदु समाज मतदान का करतो ?

एका शायराने म्हटले आहे, ‘‘जब उसुलोंपे आँच आये तो टकराना जरूरी हैं । जब जिंदा हो तो जिंदा दिखाना जरूरी हैं ।’’ (जेव्हा तत्त्वांना झळ बसते, तेव्हा शक्ती दाखवणे आवश्यक असते, तसेच जिवंत असतांना आपण जिवंत दिसणे आवश्यक आहे.) ‘हिंदु समाज मृत नव्हे, तर एक जिवंत समाज आहे, हे हिंदू आपल्या कृतीतून कधी दाखवणार ?’, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. राजकीय पक्ष आणि नेते हिंदूंवर कितीही अन्याय झाला, तरी तोंडात मूग गिळून स्वस्थ बसतात. ते कधीच हिंदूंची न्याय बाजूही उचलून धरत नाहीत. ‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांची बाजू अन्यायाची असली, तरी ती उचलून धरण्यासाठी ते चढाओढीने पुढे सरसावतात.

अशा राजकीय पक्ष आणि नेते यांना हिंदु समाज मतदान का करतो ?’, हा प्रश्नही मला सारखा सतावत असतो. आपल्याला सदैव लाथा घालणार्‍या, आपल्या श्रद्धास्थांनाची थट्टा करून त्यांचा अपमान करणार्‍यांना, अन्य धर्माच्या श्रद्धास्थानांसमोर नतमस्तक होणार्‍यांना जर हिंदु समाज निवडून देत असेल, तर त्याची दुर्दशा प्रत्यक्ष परमेश्वरही रोखू शकणार नाही.

८. ‘काफिरांची हत्या करणे आणि त्यांची मालमत्ता लुटणे’, हे धर्मांधांच्या दृष्टीने धर्मसंमत असते, हे हिंदूंनी जाणणे आवश्यक !

जेव्हा धर्मांध मुसलमान क्षुल्लक कारणांसाठीही मुसलमानेतरांच्या कत्तली करतात. आत्मघातकी आक्रमणे आणि बाँबस्फोट करून सहस्रो निष्पापांचे प्राण घेतात, दंगलीमध्ये लुटालूट करतात; घरे, दुकाने, वाहने जाळतात, तेव्हा ते समोरचा व्यक्ती हिंदु, बौद्ध, जैन, शीख, ब्राह्मण, राजपूत किंवा जाट, मारवाडी, कुणबी वा मराठा, तेली कि चांभार आहे ? असा कोणत्याच जाती-धर्माचा विचार करत नसतो. त्याच्या दृष्टीने सर्व मुसलमानेतर हे केवळ काफीर म्हणजे त्यांचे शत्रूच असतात आणि काफिरांची हत्या करणे, त्यांची मालमत्ता लुटणे, हे धर्मांध मुसलमानांच्या दृष्टीने न्याय आणि धर्मसंमत असते; पण दुर्दैवाने भारतातील विविध धर्म, जात अन् संप्रदाय यांचे लोक हे वास्तव लक्षात घ्यायला सिद्ध नाहीत. हिंदु धर्मातील एखाद्याची मुसलमान कट्टरतावाद्याकडून हत्या झाली, तर इतर धर्म आणि संप्रदाय यांतील जनता शांत असते. एखाद्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची धर्मांधांनी हत्या केली, तर इतर राजकीय पक्षांना त्या हत्येशी काही देणे-घेणे नसते. काश्मीरमधून हिंदूंना धर्मांधांनी हाकलून दिले. त्यांच्या मुलींवर बलात्कार केले. भारतातील इतर घटक राज्यांच्या दृष्टीने ती केवळ काश्मीर राज्याची समस्या असते. या देशातील मुसलमानेतर समाजाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्यांनी धर्म, संप्रदाय, जात, असे भेद; राजकीय आणि वैचारिक मतभेद, पाणी, भाषा अन् सीमा यांचे वाद, असे आपासांतील सर्व भेद आणि वाद विसरून एकजूट व्हावे लागेल, तरच भारतातील मुसलमानेतरांचे अस्तित्व शेष राहील. अन्यथा येत्या काही शतकातच देशातील हिंदु, जैन, बौद्ध, शीख यांचे अस्तित्व समाप्त होऊन हा देश इस्लामी झाल्याविना रहाणार नाही.     (क्रमशः)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ. (९.१.२०२३)