इस्‍लामच्‍या स्‍थापनेपासून धर्मांध आणि जिहादी वृत्तीच्‍या मुसलमानांकडून हिंदूंचे हत्‍यासत्र चालूच !

भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

प्रतिकात्मक छायाचित्र

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्‍हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्‍यामध्‍ये काही ना काही कारणास्‍तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यांवरील उपाय याविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत. १२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात ‘नूपुर शर्मा यांच्‍या वक्‍तव्‍यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायमूर्तींनी घेतलेली अनाकलनीय भूमिका, सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या मतावर पाकिस्‍तानमधील मौलानाने नोंदवलेले मत आणि नूपुर शर्मा यांच्‍या समर्थनार्थ देशातील ११७ मान्‍यवरांनी न्‍यायाधिशांच्‍या टिपणीविषयी व्‍यक्‍त केलेला संताप’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.    

(भाग ६)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/653518.html
प्रतिकात्मक छायाचित्र

१. तलवारीच्‍या बळावर जगातील ५७ देश झाले इस्‍लामी !

‘भारतात जुलै २०२२ मध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांधांकडून ज्‍या हत्‍या झाल्‍या आणि नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍यांना ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणेे) अशा ज्‍या धमक्‍या येत आहेत, त्‍याला नूपुर शर्मा यांच्‍या वक्‍तव्‍याला उत्तरदायी (जबाबदार) ठरवणे, हे हिंदूंची दिशाभूल करण्‍यासारखे आहे’, असे म्‍हणणार्‍यांना मुसलमानांची मानसिकता समजली नाही, असेच म्‍हणावे लागेल. नूपुर शर्मा यांचे वक्‍तव्‍य हे मुसलमान कट्टरतावाद्यांना हिंदूंच्‍या हत्‍या करण्‍यासाठी मिळालेले एक निमित्त आहे. जगातील मुसलमानांविना अन्‍य धर्मियांना काफीर समजून एक तर त्‍यांना जगातून नष्‍ट करणे किंवा त्‍यांचे धर्मपरिवर्तन करून त्‍यांना इस्‍लाम धर्माची दीक्षा घेण्‍यास बाध्‍य करणे, यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या मार्गांचा अवलंब करणे, हा इस्‍लाम धर्माच्‍या अनुयायांचा आणि त्‍याच्‍या निर्मितीपासूनचाच मुख्‍य विषय (अजेंडा) आहे. इतिहासाकडे नजर टाकली, तर ही वास्‍तविकता लक्षात येईल. वर्ष ६१० मध्‍ये या इस्‍लाम धर्माची स्‍थापना झाली आणि अवघ्‍या १ सहस्र ४०० वर्षांत या जगातील ५७ देश इस्‍लामी झाले. या ५७ देशांत जे अन्‍य धर्मीय होते त्‍यांचा, त्‍यांची प्रार्थनास्‍थळे, सभ्‍यता आणि संस्‍कृती यांचा पूर्णपणे विच्‍छेद करण्‍यात आला. या ५७ देशांतील सर्व प्रजेसमोर मुसलमान आक्रमकांनी ३ पर्याय ठेवले. पहिला पर्याय ‘इस्‍लामचा स्‍वीकार करा’, दुसरा पर्याय ‘या भूमीवरून अन्‍यत्र निघून जा’ आणि तिसरा पर्याय, म्‍हणजे ‘वरील दोन पर्याय मान्‍य नसतील, तर मरणाला सिद्ध रहा.’ या पर्यायानुसार काही जणांनी इस्‍लामचा स्‍वीकार केला, काही जण आपला धर्म वाचवण्‍यासाठी नेसत्‍या वस्‍त्रासह अन्‍य देशांत पळून गेले, तर काही धर्मासाठी लढता लढता मेले. अशा प्रकारे ५७ देश तलवारीच्‍या बळावर मुसलमान झाले.

श्री. शंकर गो. पांडे

२. मुसलमान आक्रमकांनी भारताला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍यासाठी केलेले प्रयत्न

भारताच्‍या इतिहासाकडे पाहिले, तर दिसून येईल की, ‘संपूर्ण जग इस्‍लाममय करणे’ या ध्‍येयाने प्रेरित होऊन अनेक मुसलमान आक्रमकांनी या देशावर एका मागून एक आक्रमणे केली आणि या देशातील सभ्‍यता अन् संस्‍कृती नष्‍ट करून या देशाला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍याचा प्रयत्न केला.

२ अ. महंमद बिन कासिमने भारतावर पहिले आणि महमूद गझनीने सोरटी सोमनाथ मंदिरावर आक्रमण करणे : भारतावर सर्वांत पहिले मुसलमान आक्रमण वर्ष ७१२ मध्‍ये महंमद बिन कासिमकडून झाले. या आक्रमणात त्‍याने लक्षावधी हिंदु स्‍त्री-पुरुषांच्‍या सरसकट कत्तली केल्‍या. लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. सहस्रोे हिंदु स्‍त्रियांची अब्रू लुटली. त्‍यांना गुलाम बनवून आपल्‍या समवेत नेले आणि त्‍यांची विक्री केली. युद्धात पराभूत झालेला हिंदु राजा दाहिर याच्‍या दोन तरुण आणि सुंदर मुलींना पकडून त्‍यांना मुसलमानांचा सर्वोच्‍च धर्मगुरु असणार्‍या खलिफाला भेट म्‍हणून दिल्‍या. यानंतर भारतावर मुसलमान आक्रमकांची मालिका (परंपरा) चालू झाली. वर्ष १००० ते १०२७ या काळात महमूद गझनीने भारतातील त्‍या काळी संपन्‍न आणि प्रसिद्ध असणार्‍या सोरटी सोमनाथ मंदिरावर १७ वेळा आक्रमण करून तेथील अपार संपत्ती हत्ती, उंट आणि घोडे यांच्‍यावर लादून नेली. सोमनाथाचे मंदिर पूर्णपणे उद़्‍ध्‍वस्‍त करून त्‍यातील शिवपिंडीवर हातोड्याचे घाव घालून ती नष्‍ट केली. त्‍याला विरोध करणार्‍या हिंदूंना कापून काढले.

२ आ. महंमद घोरीने पृथ्‍वीराज चौहानचा पराभव करणे आणि कुतुबुद्दीन ऐबकने नालंदा विश्‍वविद्यालय पूर्णपणे उद़्‍ध्‍वस्‍त करणे : अफगाणिस्‍तानच्‍या महंमद घोरीने वर्ष ११७३ ते १२०६ या त्‍याच्‍या कार्यकाळात भारतात शिरकाव केला. जयचंद राठोडने आपला मावस भाऊ पृथ्‍वीराज चौहान याचा पराभव करण्‍यासाठी त्‍याला आमंत्रित केले होते. घोरीने जयचंदच्‍या समवेत पृथ्‍वीराजचा तर पराभव केलाच; पण नंतर जयचंदलाही ठार केले. त्‍यानेही लक्षावधी हिंदूंच्‍या हत्‍या केल्‍या. हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले. त्‍याच्‍यानंतर राज्‍यारूढ झालेला त्‍याचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबकनेही घोरीचाच कित्ता गिरवला. कुतुबुद्दीनचा गुलाम असणार्‍या बख्‍तियार खिलजीने वर्ष १२०० मध्‍ये नालंदाचे जगप्रसिद्ध असणारे विश्‍वविद्यालय पूर्णपणे उद़्‍ध्‍वस्‍त केले. विद्यालयातील अनमोल ग्रंथ संपदा जाळून टाकली. असे म्‍हणतात की, त्‍याने पेटवलेली ग्रंथसंपदेची होळी सलग ६ मास जळत होती. विश्‍वविद्यालयातील अनेक बौद्ध भिक्षू आणि हिंदु धर्माचार्य यांच्‍या हत्‍या केल्‍या.

२ इ. अल्लाउद्दीन खिलजीपासून औरंगजेबपर्यंतच्‍या मुसलमान शासकांनी हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार करणे : यानंतर वर्ष १३१३ मध्‍ये अल्लाउद्दीन खिलजीने सौंदर्यामुळे अतिशय प्रसिद्ध असणारी चितोडची राणी पद्मिनी हिला मिळवण्‍यासाठी चितोडगडावर आक्रमण केले. स्‍वतःची अब्रू वाचवण्‍यासाठी पद्मिनीसह सहस्रोे राजपूत स्‍त्रियांनी जोहार केला. या युद्धात सहस्रोे राजपूत मारले गेले. राजा रत्नसिंह याचा पराभव झाल्‍यानंतरही खिलजीने सहस्रोे निष्‍पाप हिंदूंच्‍या हत्‍या केल्‍या. वर्ष १५१९ मध्‍ये बाबराने भारतात मोगल वंशाची स्‍थापना केली. त्‍याचा सेनापती मीर बाकीने वर्ष १५२७ मध्‍ये अयोध्‍येतील श्रीराम जन्‍मभूमीवरची मंदिरे तोडून तेथे मशीद उभारली. त्‍याला विरोध करणार्‍या हिंदूंच्‍या त्‍याने सरसकट हत्‍या केल्‍या. बाबरानंतर देहलीच्‍या गादीवर त्‍याच्‍याच वंशातील हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहांन, औरंगजेब बसले. हे सारे राजे हिंदुद्वेष्‍टे होते. या सर्वांनी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारणे, हिंदूंचे धर्मांतर करणे, हिंदु स्‍त्रियांना जनानखान्‍यात भरती करणे, विरोध करणार्‍या हिंदूंंच्‍या सरसकट हत्‍या करणे, अशीच दुष्‍कर्मे त्‍यांच्‍या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणावर आणि मुसलमान धर्माच्‍या शिकवणुकीनुसार न चुकता केली. शहाजहांनने शिवमंदिराची जागा बळकावून तेथे ताजमहाल उभारला.

२ ई. औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडून छत्रपती संभाजी महाराज, गुरु तेगबहादूर आणि गुरु गोविंदसिंह यांच्‍या दोन्‍ही मुलांना हालहाल करून मारणे : त्‍यानंतर आपल्‍या वडिलांना आणि ३ भावांना ठार करून औरंगजेब सत्तेवर बसला. या औरंगजेबाने इतर अनेक मंदिरासह काशीविश्‍वनाथ आणि मथुरेचे श्रीकृष्‍ण जन्‍मभूमीवरचे कृष्‍ण मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त करून तेथे मशिदी उभारल्‍या. औरंगजेबाच्‍या कारकीर्दीत हिंदूंवरील अत्‍याचारांनी कळस गाठला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास नकार दिल्‍यामुळे त्‍यांचा अतोनात छळ करून त्‍यांना ठार करणारा हाच औरंगजेब होता. शिखांचे धर्मगुरु तेगबहादूर यांनी मुसलमान धर्म स्‍वीकारण्‍यास नकार दिला; म्‍हणून याच औरंगजेबाने देहलीच्‍या चौकात त्‍यांचे डोके शरिरापासून वेगळे केले होते. याच औरंगजेबाने शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांच्‍या जोरावरसिंह आणि फतेहसिंह या अल्‍पवयीन मुलांना जिवंतपणे भिंतीत चिणून मारले होते.

२ उ. १७ आणि १८ व्‍या शतकात लक्षावधी हिंदूंच्‍या हत्‍या आणि धर्मांतर होणे : वर्ष १७४८ ते १७६७ या काळात अहमदशहा अब्‍दाली (दुरानी) याने भारतावर ७ वेळा आक्रमण करून सहस्रोे हिंदूंच्‍या हत्‍या केल्‍या. १८ व्‍या शतकात दक्षिण भारतातील शासक हैदरअली आणि त्‍याचा मुलगा टिपू सुलतान या दोघांनीही लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. त्‍यास नकार देणार्‍या हिंदूंना ठार केले.

२ ऊ. ‘खिलाफत चळवळी’मध्‍ये केरळमध्‍ये सहस्रो निष्‍पाप हिंदूंच्‍या कत्तली, तर सहस्रोे स्‍त्रियांवर बलात्‍कार करण्‍यात येणे : वर्ष १९१९ मध्‍ये तुर्कस्‍तानमधील (आताचे तुर्कीये) मुसलमानांचे सर्वोच्‍च धर्मगुरु खलिफाचे पद तेथील शासकांनी रहित केले; पण त्‍या पदाची पुनर्स्‍थापना व्‍हावी; म्‍हणून भारतात भारतातील मुसलमानांनी चळवळ चालू केली. या ‘खिलाफत चळवळी’शी हिंदूंचा कोणताही संबंध नसतांना केरळमध्‍ये सहस्रो निष्‍पाप हिंदूंच्‍या हत्‍या करण्‍यात आल्‍या. सहस्रोे हिंदु स्‍त्रियांवर बलात्‍कार करण्‍यात आले. अनेक हिंदु स्‍त्रियांनी आपली विटंबना होऊ नये; म्‍हणून विहिरीत उड्या घेऊन आत्‍महत्‍या केल्‍या. केरळमधील विहिरी हिंदु स्‍त्रियांच्‍या प्रेतांनी खचाखच भरल्‍या होत्‍या.

३. स्‍वातंत्र्यपूर्व आणि स्‍वातंत्र्याच्‍यावेळी मुसलमानांनी वेगळ्‍या प्रदेशाची मागणी करत हिंदूंवर केलेले अत्‍याचार

स्‍वातंत्र्यपूर्व काळात मुसलमानांनी ‘केवळ मुसलमानांसाठीच वेगळा प्रदेश तोडून द्यावा’, अशी मागणी केली. केवळ मागणी करूनच ते थांबले नाहीत, तर भारतातील अनेक राज्‍यात दंगली चालू केल्‍या. या दंगलींची सविस्‍तर माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्‍यांच्‍या ‘पाकिस्‍तान अर्थात् भारताची फाळणी’, या पुस्‍तकात दिली आहे. या दंगलीत सहस्रो हिंदूंचे जीवित आणि वित्त यांची अपरिमित हानी झाली. अखेर बॅरिस्‍टर जिनांच्‍या नेतृत्‍वाखाली वर्ष १९४७ मध्‍ये भारताची फाळणी होऊन पाकिस्‍तानची निर्मिती झाली; पण या फाळणीच्‍या वेळेसही १० लाख हिंदू विस्‍थापित झाले. सहस्रोे हिंदूंच्‍या कत्तली करण्‍यात आल्‍या. सहस्रोे हिंदु स्‍त्रियांवर अमानुष बलात्‍कार झाले.

४. धर्मांध मुसलमानांनी काश्‍मिरी हिंदूंवर केलेले नृशंस अत्‍याचार

वर्ष १९८९ – १९९० या वर्षांत काश्‍मीरमधून साडेचार लाख हिंदूंना तेथील धर्मांध मुसलमानांनी हाकलून दिले. त्‍यांची शेतभूमी आणि घरे यांना कह्यात घेतले. त्‍यांच्‍या स्‍त्रियांवर केवळ बलात्‍कारच केले, असे नव्‍हे, तर त्‍यांच्‍या नृशंसपणे हत्‍याही करण्‍यात आल्‍या. काश्‍मीरमधून विस्‍थापित झालेले एकेकाळचे संपन्‍न हिंदू अद्यापही विपन्‍नावस्‍थेतील जीवन जगत आहेत.

५. ‘गजवा-ए-हिंद’चे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी धर्मांधांकडून हिंदूंची हत्‍या

वर्ष १९४७ मध्‍ये मुसलमानांसाठी भारताचा भूभाग तोडून दिला, तरी अनुमाने २ कोटी मुसलमान भारतातच राहिले. आता ते ३२ कोटी झाले आहेत. एकीकडे पाकिस्‍तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा निर्वंश केला जात असतांना दुसरीकडे भारतातील स्‍वतःची लोकसंख्‍या वाढवून ‘गजवा-ए-हिंद’चे (सर्व काफीर हिंदूंना ठार करून भारतात इस्‍लामी राजवट आणणे) स्‍वप्‍न साकार करणे, हे मुसलमानांचे उद्दिष्‍ट आहे; पण ते अद्यापही हिंदूंच्‍या लक्षात येऊ नये, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे. याच उद्दिष्‍टांतर्गतच भारतावर २६/११ या दिवशी (२६.११.२००८ या दिवशी मुंबईवर समुद्रमार्गे येऊन आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण) पाककडून भीषण आक्रमण करण्‍यात आले. या उद्दिष्‍टांतर्गतच भारतात शेकडो आत्‍मघातकी पथकांकडून आक्रमणे आणि बाँबस्‍फोट झाले. या उद्दिष्‍टांतर्गतच भारतात कुठे ना कुठे धार्मिक दंगली आणि हिंदूंच्‍या हत्‍या होत असतात.

६. देशात अशांतता आणि भयाचे वातावरण निर्माण करण्‍यासाठी धर्मांधांकडून केल्‍या जातात दंगली !

हा सर्व इतिहास थोडक्‍यात सांगण्‍यामागचे तात्‍पर्य एवढेच आहे की, नूपुर शर्मा यांच्‍या विधानाच्‍या अगोदरही या देशात फार पूर्वीपासून धर्मांध आणि कट्टर जिहादी वृत्तीच्‍या मुसलमानांकडून हिंदूंचे हत्‍यासत्र चालूच आहे. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबरांविषयी केलेले विधान असो, तलाक (घटस्‍फोट) बंदी आणि नागरिकत्‍व सुधारणा कायदा (सीएए) असो, सैन्‍यात भरतीसाठी आणलेली ‘अग्‍नीवीर योजना’ असो किंवा हिंदूंच्‍या शोभायात्रा असो, यांपैकी कोणतेही कारण मुसलमानांना या देशात अशांतता आणि भयाचे वातावरण निर्माण करण्‍यास पुरेसे असते. त्‍यामुळे भारतातील अशांततेसाठी नूपुर शर्मा यांच्‍या विधानाला उत्तरदायी ठरवणे, हे सर्वथा चुकीचे आहे.’             (क्रमशः)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्‍हा यवतमाळ. (९.१.२०२३)