भारतातून पाकमध्ये ६ नद्या (रावी, व्यास, सतलज, सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्या) वहातात. त्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क आहे. तरीही आपण पाकला नद्यांचे ८० टक्के पाणी दिले. हे पाणी आपण वर्ष १९६० च्या भारत-पाकमधील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’नुसार देतो. याच करारानुसार आपण जेव्हा आपल्या क्षेत्रात धरण बांधतो, त्यावर पाकला आक्षेप घेण्याचा अधिकारही दिला. याचा अपलाभ आता पाकिस्तान घेत आहे. म्हणूनच पहिल्यांदा भारताने पाकला नोटीस दिली. आता वेळ आली आहे या कालबाह्य करारावर पुनर्विचार करण्याची !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय धोरणांचे विश्लेषक (२९.१.२०२३)
(साभार : फेसबुक)